पुतण्याच्या सोयरीकीच्या कार्यक्रमात अचानक काका कोसळले; हृदयविकाराने झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 13:47 IST2023-02-27T13:47:24+5:302023-02-27T13:47:43+5:30
चहापान सुरु असताना अचानक तब्येत बिघडून काका कोसळले

पुतण्याच्या सोयरीकीच्या कार्यक्रमात अचानक काका कोसळले; हृदयविकाराने झाला मृत्यू
भोकरदन ( जालना): पुतण्याला पाहण्यासाठी आलेल्या पाहुण्यांच्या समोरच मुलाच्या काकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. शेणफड पालोदे ( ६२) असे मृताचे नाव आहे. ही घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास तालुक्यातील गोकुळ येथे घडली.
उत्तम पालोदे यांच्या मुलाला बघण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील राहिमाबाद येथील पाहुणे आज सकाळी 10 वाजेच्या दरम्यान आले होते. यावेळी उत्तम पालोदे यांचे मोठे भाऊ शेणफड पालोदे कार्यक्रमास होते. चहापान सुरु असताना अचानक शेणफड यांच्या छातीत त्रास सुरु झाला. ते त्याच ठिकाणी पलंगावर कोसळले. यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गोकुळ गावावर शोककळा पसरली. दरम्यान, शेणफड पालोदे यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी सून, नातवंडे असा परिवार आहे.