बदनापूरजवळ अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 18:21 IST2024-07-12T18:21:03+5:302024-07-12T18:21:26+5:30
जालना ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वरुडी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.

बदनापूरजवळ अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
बदनापूर ( जालना): जालना ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वरुडी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी साडेनऊ वाजता घडली. शेख नाजीम शेख हमीद ( १८) आणि शेख कलीम अब्दुल नबी ( १८, दोघे रा. काकडे वस्ती, वरुडी ) अशी मृतांची नावे आहेत.
वरुडी येथील दोन युवक शेख नाजीम शेख हमीद आणि शेख कलीम अब्दुल नबी दुचाकीवरून बदनापूरकडे जात होते. सकाळी साडेनऊ वाजता जालना ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वरुडी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात शेख नाजीम शेख हमीद आणि शेख कलीम अब्दुल नबी या दोघांचाही गंभीर जखमी मृत्यू झाला. यामधील एक युवक कंपनीत नोकरी करत होता. तर दुसरा शिक्षण घेत असल्याची माहिती पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब जऱ्हाड यांनी दिली.