जालन्यात दोन मोबाईल चोरांना अटक, ३३ मोबाईल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 15:32 IST2018-11-01T15:32:44+5:302018-11-01T15:32:55+5:30

स्थानिक गुन्हे शाखेने आज विशेष मोहिम राबवत दोन मोबाईल चोरांना ताब्यात घेतले.

Two mobile thieves arrested in Jalna, 33 mobile seized | जालन्यात दोन मोबाईल चोरांना अटक, ३३ मोबाईल जप्त

जालन्यात दोन मोबाईल चोरांना अटक, ३३ मोबाईल जप्त

जालना : स्थानिक गुन्हे शाखेने आज विशेष मोहिम राबवत दोन मोबाईल चोरांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे ३३ मोबाईल जप्त करण्यात आले. सागर बबन ढाकणे (२१), अतिष रंजीत आडसूळ (१९) (दोघे रा. संभाजी नगर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना खबऱ्या मार्फेत माहिती मिळाली की, जालना बसस्थानकाजवळ एका व्यक्तीचा नवीन मोबाईल सागर ढाकने व अतिश आडसूळ यांनी मारहाण करून पळवला. या माहितीवरुन त्यांनी आरोपींना ताब्यात घेवून त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली.  

पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता दोघांनी बसस्थानक, रेल्वेस्टेशन, आठवडी बाजार, मंदिर आदी गर्दीच्या ठिकाणी विविध नामांकित कंपनीचे ३३ स्मार्ट फोन चोरल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून ३ लाख ५५ हजार ४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राजेंद्रसिंह गौर, पोउपनि. जयसिंग परदेशी, कर्मचारी शेख रज्जाक, कमलाकर अंभोरे, सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, समाधान तेलंग्रे,  प्रशांत देशमुख, विनोद डदे, सागर बाविस्कर, सचिन चौधरी, सदाशिव राठोड, संदिप मांटे, विलास चेके, लखन पचलोरे, परमेश्वर धुमाळ, सोमनाथ उबाळे, राहुल काकरवाल, रवि जाधव यांनी केली.

Web Title: Two mobile thieves arrested in Jalna, 33 mobile seized