ट्रेलर-कंटेनर अपघातात दोनजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:16 AM2019-12-30T00:16:59+5:302019-12-30T00:17:36+5:30

ट्रेलर आणि कंटेनरच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोनजण ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना जालना - औरंगाबाद महामार्गावरील गेवराई बाजार फाट्याजवळ रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.

Two killed in trailer-container crash | ट्रेलर-कंटेनर अपघातात दोनजण ठार

ट्रेलर-कंटेनर अपघातात दोनजण ठार

Next
ठळक मुद्देबदनापूर : गेवराई बाजार फाट्याजवळ पुन्हा एक मोठा अपघात घडल्याने चिंता

बदनापूर : ट्रेलर आणि कंटेनरच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोनजण ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना जालना - औरंगाबाद महामार्गावरील गेवराई बाजार फाट्याजवळ रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. विठ्ठल रंगनाथ बरबडे (२७. रा. पाचेगाव ता. गेवराई. जि. बीड), अमन अजीज (रा. भिलाई. छत्तीसगड) असे मयतांची नावे आहेत.
जालन्याकडून औरंगाबादकडे जाणारा कंटेनर (क्रं. एमएच. ४३. वाय. ७१३०) दुभाजकावर चढला. याचवेळी औरंगाबादकडून जालन्याकडे येणाऱ्या ट्रेलरने े(क्रं.सीजी.०७.बिके.७४११) धडक दिली. हा अपघातजालना - औरंगाबाद मार्गावरील गेवराई बाजार फाट्याजवळ घडला. या अपघातात कंटेनर चालक विठ्ठल बरबडे हे जागीच ठार झाले तर अमन अजीज यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून, त्यांचे नाव समजू शकले नाही. या धडकेत दोन्ही वाहनांचा चुराडा झाला आहे.
दरम्यान, अपघातामुळे मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. या अपघातानंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अनेजणांनी या अपघाताचे फोटो मोबाईल मध्ये कैद केले.
तीन दिवसात दुसरा अपघात
जालना - औरंगाबाद महामार्गवर दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. वाहनांची वाढती संख्या, वाहनांचा अतिवेग यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. तीन दिवसांपूर्वीच या मार्गावरील शेकट्या जवळ कारने रिक्षाला धडक दिली होती.त्यात पाचजण ठार झाले.

Web Title: Two killed in trailer-container crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.