अपघातात दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 00:57 IST2019-10-06T00:57:31+5:302019-10-06T00:57:48+5:30
हिस्वन- इस्लामवाडी गावाच्या मध्ये दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांच मृत्यू झाला. तर एक मुलगी गंभीर जखमी झाली.

अपघातात दोघांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना/ राणी उंचेगाव : हिस्वन- इस्लामवाडी गावाच्या मध्ये दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांच मृत्यू झाला. तर एक मुलगी गंभीर जखमी झाली. हा अपघात शनिवारी सकाळी घडला असून, या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
भीमराव नामदेव लोंढे (४४ रा. तळेगाव ता. घनसावंगी), शाम विष्णू मुळे (१९ रा. पुणेगाव ता. जालना) अशी मयतांची नावे आहेत. घनसावंगी तालुक्यातील तळेगाव येथील भीमराव नामदेव लोंढे आणि त्यांची मुलगी योगिता भीमराव लोंढे (१८) हे दोघे शनिवारी सकाळी दुचाकीवरून जडाई देवीच्या दर्शनासाठी जात होते. त्यांची दुचाकी हिस्वन- इस्लामवाडी मार्गावर आली असता पुणेगाव येथून गाढे सावरगावकडे जाणाऱ्या शाम विष्णू मुळे याच्या
दुचाकीशी जोराची धडक झाली. या अपघातात भीमराव लोंढे, शाम मुळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर योगिता लोंढे ही मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारासाठी जालना येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोकॉ किशोर तराळ यांनी दिलेल्या माहितीवरून तालुका जालना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोनि गंदम हे करीत आहेत.