मंगळवार ठरला आंदोलनवार : तीन ठिकाणी निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST2021-07-07T04:37:16+5:302021-07-07T04:37:16+5:30
गेल्या सहा वर्षांत अच्छे दिनच्या नावाखाली पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती वापराच्या गॅसचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे ...

मंगळवार ठरला आंदोलनवार : तीन ठिकाणी निदर्शने
गेल्या सहा वर्षांत अच्छे दिनच्या नावाखाली पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती वापराच्या गॅसचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे महागाई वाढली असून, जीवन जगणे अवघड झाले आहे. ही दरवाढ त्वरित मागे घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. तसेच केंद्र सरकारच्या एकूणच धोरणावर उपस्थित नेत्यांनी तीव्र शब्दांत टीका केली. गॅस दरवाढीचा मुद्दाही या वेळी चांगलाच पेटला. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले असल्याचे सुरेखा लहाने, शाजिया शेख आदींनी सांगितले. या निदर्शने कार्यक्रमानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.
-----------------------------------------------------
भाजपकडून आमदारांच्या निलंबनाचा निषेध
जालना : विधानसभेत गोंधळ घातल्याचे कारण पुढे करीत सोमवारी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. त्यांचे निलंबन त्वरित मागे घ्यावे तसेच निलंबन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी जोरदार निदर्शने केली. या वेळी भाजपचे शहराध्यक्ष राजेश राऊत, जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, धनराज काबलिये, सुनील राठी, बबन बावणे, उपाध्यक्ष चंपालाल भगत, रोशन चौधरी, नगरसेवक महेश निकम, राहुल इंगोले, सतीश चंद्रप्रभू, सिद्धेश्वर हजबे, संजय डोंगरे, युवामोर्चा शहराध्यक्ष सुनील खरे, रोहित नलावडे, अमोल कारंजेकर, सोपान पेंढारकर, महादेव कावळे, श्रीकांत शेलगावकर, बाबूराव भवर डोंगरसिंग साबळे, बद्रीनाथ वाघ, विकास कदम, राजेश घोडके, विशाल उफाड, विवेक पाटील, कृष्णा गायके, बाळासाहेब जोशी, कृष्णा मोहिते, शेखर बुंदिले, सुधाकर शिंदे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------------------------------------------------------
काजळा पाटीवर रास्तारोको
जालना : जालना ते अंबड मार्गावरील काजळा पाटीजवळ मंगळवारी सकाळी काजळा पाटी ते काजळा गाव या चार ते पाच किलोमीटरच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. काजळा या गावासह अन्य २० पेक्षा अधिक गावांसाठी हा रस्ता मजबूत होणे गरजेचे आहे. आज या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहन तसेच बैलगाडी चालविणे अवघड झाले आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष द्यावे, अशी मागणी या वेळी ग्रामस्थांनी केली.
हे निवेदन देताना सरपंच प्रयागाबाई रंगनाथ देवकते, ओमप्रकाश चितळकर, शिवप्रकाश चितळकर, प्रकाश गावडे, धनंजय गरड, दिलीप गावडे, रवी महाराज मदने, घनश्याम खांडेकर, कैलास हाके, रवी राऊत, बंडू कुऱ्हाडे, भय्यासाहेब गोगडे, लाला पैठणे, कैलास खांडेकर, ज्ञानेश्वर बाेबडे, राहुल तुपे, विजय भोसले, राजू कुळेकर आदी उपस्थित होते.