क्षयरोग जनजागृती रॅलीस प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:49 IST2018-03-25T00:49:02+5:302018-03-25T00:49:02+5:30
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा क्षयरोग नियंत्रण समिती व जिल्हा क्षयरोग केंद्राच्यावतीने शहरातून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

क्षयरोग जनजागृती रॅलीस प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा क्षयरोग नियंत्रण समिती व जिल्हा क्षयरोग केंद्राच्यावतीने शहरातून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीस सुरुवात केली. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक एम. के. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते, आयएमएचे सचिव डॉ. आशितोष सोनी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ए.जी. सोळंके, डॉ. योगेश सुरळकर, डॉ. आय. के. जागीरदार आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्वामी विवेकानंद शाळेपासून सतकर कॉम्प्लेक्स या मार्गे काढण्यात आलेल्या रॅलीचा जिल्हा क्षयरोग कार्यालयात समारोप झाला. सीईओ अरोरा यांनी क्षयरोगाबाबात सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले. शासकीय रुग्णालयांमध्ये क्षयरोगावर मोफत उपचार केले जातात, असक डॉ. सोनी यांनी सांगितले. क्षयरोग दिनानिमित्त आयोजित स्पर्धेतील विद्यार्थ्यांना या वेळी बक्षीस वाटप करण्यात आले. किशोर आघाम यांनी संचालन केले, विलास जवळेकर यांनी आभार मानले.