चार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 01:05 IST2018-06-09T01:05:15+5:302018-06-09T01:05:15+5:30

जालना पोलीस दलातील चार उपविभागीय पोलीस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी विभागाने काढले आहेत.

Transfers of four sub-divisional police officers | चार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

चार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना पोलीस दलातील चार उपविभागीय पोलीस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी विभागाने काढले आहेत.
जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी यांची बदली जालन्यातच पोलीस उपअधीक्षक (गृह) या पदावर बदली झाली आहे. या पदावर कार्यरत अभय देशपांडे यांची नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे बदली झाली आहे. तर जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून शीलवंत ढवळे येणार आहेत.
अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनवणे यांची वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी सी.डी. शेवगण बदलून येणार आहेत. भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर वसावे यांची नाशिक शहर येथे बदली झाली आहे.

Web Title: Transfers of four sub-divisional police officers