ग्रामीण भागात पारंपरिक उद्योग आजही तग धरून
By Admin | Updated: October 17, 2014 00:26 IST2014-10-17T00:13:13+5:302014-10-17T00:26:37+5:30
विष्णू वाकडे, रामनगर दिवाळीसण अवघ्या आठ दिवसावर येवून ठेपली आहे. एकीकडे निवडणुकीची धामधूम तर दुसरीकडे दिवाळीची तयारी सुरू आहे. दिवाळीला लागणाऱ्या पणत्या,

ग्रामीण भागात पारंपरिक उद्योग आजही तग धरून
विष्णू वाकडे, रामनगर
दिवाळीसण अवघ्या आठ दिवसावर येवून ठेपली आहे. एकीकडे निवडणुकीची धामधूम तर दुसरीकडे दिवाळीची तयारी सुरू आहे. दिवाळीला लागणाऱ्या पणत्या, बोळके तयार करण्यास ग्रामीण भागातील कुंभारबांधव सध्या व्यस्त आहेत.
आधुनिक युगात आता सर्वच काही रेडीमेड साहित्य मिळते. बाजारात तयार पणत्या दाखल झालेल्या आहेत. मात्र आजही मातीच्या पणत्या आणि बोळक्यांची मागणी मोठी आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कुंभारदादा ते बनविण्यात व्यस्त आहेत.
हातवन येथील भुजंग सोनगावकर यांचे अख्ये कुटुंबिय मागील महिनाभरापासून तयारीला लागले आहे. या बाबत बोलताना ते म्हणाले की, आमचा हा पारंपरिक व्यवसाय आहे.
पूर्वी या व्यवसाच्या माध्यमातून वर्षभर उदरनिर्वाहची सोय होत, आता मात्र फक्त ठराविक काळातच हा व्यवसाय करावा लागत आहे. इतरवेळ जमेल ते काम करून उदरनिर्वाह करावा लागत आहे.
दिवाळी, मकर संक्राती आणि उन्हाळ्यात लागणारे माठ असे ठराविक वेळेतच व्यवसाय चालत असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण उद्योगांना चालना
पूर्वीचा पारंपारिक असलेला हा ग्रामीण उद्योग आताच्या आधुनिकतेमुळे कमी होत चालला आहे. आजही काही ठिकाणी ग्रामीण भागात हा उद्योग तग धरून आहे.
अशा अनेक ग्रामीण पारंपारिक उद्योगाना चालना देण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत अशी अपेक्षाही सोनगावकर यांनी व्यक्त केली.