धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 19:40 IST2025-06-20T19:36:20+5:302025-06-20T19:40:24+5:30

आता कॅनडा येथे १४ ते २४ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या स्पर्धेत भारतीय संघात खेळणार

Towards dreams with bow and arrow; Jalana's Tejal Salve strikes gold in Singapore! | धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!

धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!

- राहुल वरशिळ
जालना :
शहरातील तिरंदाज (धनुर्विद्या) तेजल राजेंद्र साळवे हिने सिंगापूर येथे १६ ते २० जूनपर्यंत आयोजित केलेल्या आशिया कप स्टेज दोनमध्ये भारतीय संघात उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेत तेजलने भारतीय प्रतिस्पर्धी असलेल्या खेळाडू बुद्धी सन्मुखी नागासाईसोबत अंतिम सामन्यांत १४६-१४४ असा पराभव करून बाजी मारली आहे. यात भारताने सुवर्ण आणि रौप्य पदकावर आपले नाव कोरले असून, सांघिक गटात तेजल साळवे, बुद्धी सन्मुखी व तनिष्का ठोकळ यांनी विश्वविक्रम केला आहे. यापूर्वी तेजलने चीन येथे झालेल्या आशियन युथ चॅम्पियनशीप २०२४ मध्ये रौप्य तर, दक्षिण कोरीया येथे २०१४ मध्ये झालेल्या आशिया कप स्टेज-३ मध्येही रौप्य पदक पटाकवले होते. गोवा येथे झालेल्या थर्टी सेव्हन नॅशनल गेम्समध्ये कांस्यपदक आपल्या नावे केले होते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तिघे सख्खे बहिण-भाऊ तिरंदाजीत तरबेज
जालना शहरातील साळवे घराण्यातील तेजलने अनेक पदके पटकावली आहे. तर बहिण प्रांजल साळवे हिनेदेखील राज्यस्तरीय स्पर्धेत पदक मिळविले असून, भाऊ आदर्श साळवेही तिरंदाजी स्पर्धेत विभागीय आणि राज्य पातळीवर आपले नशीब अजामावत आहेत. एकाच घरातील तिघेही सख्खे बहिण-भाऊ आर्चरीमध्ये खेळून सर्वांसमोर एक आदर्श निर्माण करीत आहेत.

रोज आठ तास सराव करून साधले लक्ष
गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने धनुर्विद्या प्रकारात खेळत आहे. यापूर्वी अनेक राष्ट्रीय, राज्य आणि विभागीय स्तरावर विविध पदके पटकावली आहेत. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही सुवर्ण पटकावले आहे. मी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी रोज आठ तास सराव करीत आहे. यापुढेही कायम सराव करून देशासाठी खेळत राहणार आहे.
- तेजल साळवे, युवा तिरंदाज, जालना.

कॅनडा येथे होणाऱ्या स्पर्धेत अजमावणार नशीब
आता सुवर्णकन्या तेजल साळवे १४ ते २४ ऑगस्टदरम्यान कॅनडा येथे होणाऱ्या युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत आपले नशीब अजमावणार आहे. १७ वर्षीय तेजलने आतापर्यंत आशियाई युवा स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि विविध एनटीपीसी नॅशनल रँकिंग स्पर्धांमध्ये पदक मिळवून तिने आपल्या खेळाची छाप पाडली आहे. त्यामुळे पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट येथे झालेल्या निवड प्रक्रियेत भारतीय संघात तिची निवड झाली आहे.

Web Title: Towards dreams with bow and arrow; Jalana's Tejal Salve strikes gold in Singapore!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.