आज मुख्यमंत्री फडणवीस भोकरदन, जालन्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:57 AM2019-08-28T00:57:43+5:302019-08-28T00:57:47+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी भोकरदन आणि जालना शहरात येत आहेत.

Today, Chief Minister Fadnavis Bhokardan, in Jalna | आज मुख्यमंत्री फडणवीस भोकरदन, जालन्यात

आज मुख्यमंत्री फडणवीस भोकरदन, जालन्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी भोकरदन आणि जालना शहरात येत आहेत. भोकरदन येथे दुपारी सभा होणार असून, जालन्यात त्यांच्या सभेचे सायंकाळी आयोजन करण्यात आले आहे. महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्र्यांचा हा दौरा असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे यांनी दिली.
जालना येथील मुख्यमंत्र्यांच्या सभा सायंकाळी ५ वाजता डॉ. फ्रेजर बॉईज मैदानावर होणार आहे. या सभेस भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, भाजपचे नेते सुजितसिंह ठाकूर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे आ. दानवे यांनी सांगितले. यावेळी व्यापाऱ्यांशीही ते चर्चा करतील.

Web Title: Today, Chief Minister Fadnavis Bhokardan, in Jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.