थरारक! वराह पालन करणाऱ्या युवकावर गावठी पिस्तूलातून गोळीबार

By विजय मुंडे  | Updated: August 8, 2022 12:43 IST2022-08-08T12:42:12+5:302022-08-08T12:43:42+5:30

हातडी-सोयंजना मार्गावरील थरार : गंभीर जखमीवर जालन्यात उपचार

Thrilling! firing on a youth by gavathi pistol in Jalana | थरारक! वराह पालन करणाऱ्या युवकावर गावठी पिस्तूलातून गोळीबार

थरारक! वराह पालन करणाऱ्या युवकावर गावठी पिस्तूलातून गोळीबार

परतूर (जालना) : दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींनी गावठी पिस्तूलातून गोळी झाडल्याने एक युवक गंभीर जखमी झाला. ही थरारक घटना सोमवारी सकाळी हातडी ते सोयंजना (ता.परतूर) मार्गावर घडली. गंभीर जखमी युवकावर जालन्यातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

जीवन महादेव जाधव (२२ रा. कंडारी ता. परतूर) असे जखमी युवकाचे नाव आहे. परतूर तालुक्यातील कंडारी येथील जीवन जाधव याने पाळलेली डुकरे गावच्या शिवारात सोडली आहेत. जीवन जाधव हा सोमवारी सकाळी हातडी ते सोयंजना मार्गावरून जात होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींनी अचानक गावठी पिस्तूलातून त्याच्यावर गोळीबार केला. गोळीबार करताच दोघे फरार झाले. तर जीवन जाधव हा गंभीर जखमी झाला. 

जखमीला पोलिसांनी तातडीने जालना येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी राजू मोरे, पोनि. श्यामसुंदर कौठाळे, उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. डुकरांच्या वाटणीवरून हा गाेळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांन वर्तविला आहे.

Web Title: Thrilling! firing on a youth by gavathi pistol in Jalana