शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
4
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
5
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
6
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
7
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
8
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
9
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
10
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
11
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
12
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
13
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
14
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
15
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
16
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
17
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
18
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
19
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
20
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

घोटभर पाण्यासाठी जीव धोक्यात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 01:03 IST

भोकरदन तालुक्यातील वरुड बु.गावात पाणीटंचाईचा कहर झाला आहे. घोटभर पाणी मिळविण्यासाठी नागरिकांना जीव धोक्यात घालून मृत्यूच्या दारात उभे राहून, पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

विजय बावस्कर ।लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : भोकरदन तालुक्यातील वरुड बु.गावात पाणीटंचाईचा कहर झाला आहे. घोटभर पाणी मिळविण्यासाठी नागरिकांना जीव धोक्यात घालून मृत्यूच्या दारात उभे राहून, पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.सध्या शेतात कामाचे दिवस असल्याने संपूर्ण दिवस येथील नागरिकांना पाणी आणण्यात घालावा लागत आहे. टँकर आल्यावर संपूर्ण गाव या विहिरीवर पाणी भरण्यासाठी एकच गर्दी करते. विशेष म्हणजे गावात तीन दिवसांपासून टँकर आले नाही. तसेच परिसरात देखील तीन किलोमीटर अंतरावर कुठेच पाणी नसल्याने वरुड बु.गावात पाणीबाणी निर्माण झाली आहे.वरुड बु. गावातील लोकसंख्या चार हजारांच्यावर आहे. गेल्या दोन महिन्यांपासून गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढली असल्याने गावात पाणीटंचाईचे संकट आणखी गडद झाले आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी येथील ग्रामपंचायतीकडून अपुऱ्या उपाययोजना केल्या असल्यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप येथील महिला व पुरुषांनी केला आहे.गावाला दानापूर येथील जुई धरणातील खोदण्यात आलेल्या विहिरीवरुन पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, धरण आटल्याने या विहिरीने देखील तळ गाठला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना आता टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. सध्या गावात एक सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर आहे.या विहिरीत पद्मावती धरणातून गावासाठी सुरू केलेल्या एका शासकीय टँकरद्वारे पाणी टाकले जाते. त्याची देखील एकच खेप होते. टँकर येणार असल्याची माहिती मिळताच गावातील पुरूष, महिला व लहान मुले या विहिरीवर एक तास अगोदरच येऊन बसतात. टँकर आल्यावर हे टँकर सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरीत सोडल्यावर मात्र, पाणी भरण्यासाठी महिला व पुरुषाची या ठिकाणी स्पर्धा लागते. अनेक वेळा या ठिकाणी पाणी काढताना वाद देखील झाले आहेत. संपूर्ण गाव एकाच विहिरीवर पाणी भरत असल्याने अनेकांना पाण्याविनाच आपले रिकामे भांडे घेऊन परतावे लागत आहे. गावात गेल्या दोन महिन्यापासून एकच टँकर सुरू आहे.लोकसंख्येच्या तुलनेत हे टँकर अपुरे पडत असल्याने ग्रामपचांयतीने वाढीव टँकरचा प्रस्ताव पाठविणे गरजेचे होते. मात्र, येथील ग्रामपंचायतीने तसे केले नसल्यामुळे गावातील महिला व पुरुषांना घोटभर पाण्यासाठी मृत्यूशी खेळावे लागत आहे. गावात तीन दिवसांपासून पाण्याचे टँकर नसल्याने नागरिकांना भर उन्हात कोसो दूर जाऊन. डबक्यातील पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. त्यातून देखील आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.१९७२ पेक्षाही भयानक दुष्काळाचा अनुभव : पाणी नेऊ नये म्हणून विहिरी झाकल्याभोकरदन तालुक्यात १९७२ पेक्षा ही भयानक दुष्काळाचा अनुभव येथील जनता घेत आहे. दिवसेंदिवस पाणी टंचाई उग्ररुप धारण करु लागली आहे. अनेकांनी तर आपल्या विहिरीवरून कुणी पाणी नेऊ नये म्हणून विहिरीवर लोखंडी पत्रे टाकून विहीर झाकली आहे. यामुळे पाणी आणावे तरी कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पाण्याच्या शोधात गोकुळ व मालखेडा येथील दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला होता. आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होईल, असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. वरुड बु.गावात मुस्लिम बांधवांची जवळजवळ तीस घरे आहेत. सध्या मुस्लिम बांधवाचा पविञ रमजान महिना असल्याने सर्वांनी रोजा धरला आहे.एकीकडे कडाक्याचे ऊन तर दुसरीकडे पोटात अन्नाचा कण नाही. अशा परिस्थितीत मुस्लिम महिलांना विहिरीवर पाणी काढण्यासाठी जावे लागत आहे.माञ, त्यांना त्या ठिकाणी पाणी काढताना ग्लानी येऊ लागली आहे.त्यामुळे मुस्लिम वर्गातून देखील तीव्र संताप व्यक्त केला जात असल्याच्या प्रतिक्रिया वरुड बु,येथील हसनूरबी शेख यांनी व्यक्त केली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ