शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

१९ मल्ल तिसऱ्या फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:49 AM

आझाद मैदानावर आजपासून सुरु झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत १९ पेक्षा जास्त मल्लांनी तिसºया फेरीत मजल मारली.

ठळक मुद्दे900पहिलवानांचा राज्यभरातून सहभाग

जयंत कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आझाद मैदानावर आजपासून सुरु झालेल्या महाराष्ट्र केसरीकुस्ती स्पर्धेत १९ पेक्षा जास्त मल्लांनी तिसºया फेरीत मजल मारली. आगेकूच करणाºया मल्लांत पुण्याचा स्वप्नील शेलार, मुंबई उपनगरचा सचिन पाटील, कोल्हापूरचा भरत पाटील, लातूरचा दत्ता भोसले यांनी गादी गटात तर ७९ किलो वजनाच्या गादी गटात नांदेडचा सोमनाथ कोरके, मुंबईच्या अभिषेक तुर्केवाडकर, हिंगोलीचा भानुदास जाधव, रायगडचा रुपेश पावसे, अहमदनगर शहरचा अब्दुल शोएब, उस्मानाबादचा किरण जवळगे, पुणे जिल्ह्याचा अभय चोरगे या मल्लांचा समावेश आहे.आज दुपारी ४.३0 वाजता ७९ व ५७ किलो वजनाच्या माती व गादी गटातील कुस्त्या रंगल्या. जबरदस्त चैतन्यपूर्ण वातावरणात सुरु झालेल्या महाराष्ट्र केसरीकुस्ती स्पर्धेचे बजरंगबलीच्या प्रतिमेचे पूजन करुन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा श्रीगणेशा झाला.यावेळी स्वागताध्यक्ष राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, विलास कथुरे, महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे, जालना जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष किसनलाल भक्त, उपाध्यक्ष लक्ष्मण सुपारकर, सरचिटणीस दयानंद भक्त, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे, विष्णू पाचफुले, संतोष मोहिते, संजय खोतकर, अभिमन्यू खोतकर आदींची उपस्थिती होती. राज्यभरातून ९00 पहिलवान या प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धेत सहभागी झाले.कुस्ती स्पर्धेचे निकाल७९ किलो (माती गट)कृष्णकांत कांबळे (कोल्हापूर) वि. वि. मोईन सय्यद (जालना), नंदकुमार काकडे (सोलापूर शहर) वि. वि. विष्णू भोसले (लातूर), आदेश चौधरी (ठाणे जि.) वि. वि. सिद्धेश पाटील (रायगड), किरण बककुडे (सातारा) वि. वि. निखील उंद्रे (पुणे), धिरज गवळी (धुळे) वि. वि. आकाश दिंडे (यवतमाळ), गौरव हगवणे (मुंबई) वि. वि. विशाल मिश्रा (अकोला), अजित शेळके (अहमदनगर) वि. वि. अजयकुमार यादव (मुंबई), हनुमंत पुरी (उस्मानाबाद) वि. वि. गणेश डेळेकर (कोल्हापूर), सुबाष चामनर (बीड) वि. वि. शेख मेहमूद (वाशिम), अझहर शेख (औरंगाबाद) वि. वि. शाहरुख खान (गोंदिया), अक्षय इंगोले (रत्नागिरी) वि. वि. नीलेश डी. (नागपूर), अंगद बुलबुले (पुणे) वि. वि. कृष्णा कांबळे (कोल्हापूर), नंदकुमार काकडे (सोलापूर शहर) वि. वि. आदेश चौधरी ठाणे), किरण बरकडे (सातारा) वि. वि. धिरज गवळी, विलास गिरी (बुलढाणा) वि. वि. गणेश जाधव (औरंगाबाद), गिरधारी डुबे (परभणी) वि. वि. सुंदर चौधरी (चंद्रपूर), अजिंक्य माळी (जळगाव) वि. वि. प्रथमेश रहाटे (ठाणे), वासुदेव साळुंके (कल्याण) वि. वि. सचिन सुरनर (नाशिक), वेताळ शेळके (सोलापूर) वि. वि. ऋषिकेश बालवडकर (पिंपरीचिंचवड).७९ किलो (दुसरी फेरी गादी गट)सोमनाथ कोरके (नांदेड) विजयी वि. अल्ताफ शेख (औरंगाबाद), अभिषेक तुर्केवाडकर (मुंबई पश्चिम) वि. वि. वैभव तागडे (पुणे शहर), भानुदास जाधव (हिंगोली) वि. वि. मयूर बावनकर (भंडारा-अनुपस्थित), रुपेश पावसे (रायगड) वि. वि. निखील वाकोडे (अकोला), अब्दुल शोएब (अहमदनगर) वि. वि. कुंभार भांगरे (नाशिक शहर), चेतन बोडखे (बुलढाणा) वि. वि. राहुल काटकर (नागपूर), किरण जवळगे (उस्मानाबाद) वि. वि. चेतन वाणी (चंद्रपूर).५७ किलो(गादी गट : दुसरी फेरी)भोलानाथ साळवी (कल्याण) वि. वि. सूरज ढेरगे (बीड), भरत पाटील (कोल्हापूर) वि. वि. भालचंद्र कुंभार (पुणे शहर), ज्योतीबा अटकळे (सोलापूर) वि. वि. दर्शन निकम (धुळे), अमोल फितवे (अकोला) वि. वि. कार्तिक शेलार (मुंबई उपनगर), राहुल कसारे (औरंगाबाद) वि. वि. सागर गुजर (अमरावती), सूरज अस्वले (कोल्हापूर शहर) वि. वि. नितीन भोळे (कोल्हापूर), दत्ता भोसले (लातूर) वि. वि. राहुल मारे (जळगाव), सागर कदम (परभणी) वि. वि. अतुल चौधरी (भंडारा), सुमित भगत (रायगड) वि. वि. विपुल लोणारी (चंद्रपूर), सचिन पाटील (मुंबई उपनगर) वि. वि. युवराज घट्टेकर (औरंगाबाद), स्वप्नील शेलार (पुणे) वि. वि. प्रथमेश कुळथे (रत्नागिरी).५७ किलो (माती)अक्षय भोईर (कल्याण) वि. वि. प्रवीण गोडसे (सातारा), हरी अंबेकर (नाशिक) वि. वि. अक्षय गिरी (वाशिम), संतोष हिरगुडे (कोल्हापूर शहर) वि. वि. श्रीनाथ पाटील (रायगड), सागर राऊत (सोलापूर) वि. वि. अशोक कासार (बुलढाणा), विनायक नाईक (पिंपरी चिंचवड) वि. वि. निशांत मांत्रीकर (अकोला), सागर मारकड (पुणे) वि. वि. सागर बी. (जालना), किरण शिंदे (पुणे शहर) अनिकेत वंजारे (गोंदिया), ओंकार लाड (कोलपूर) वि. वि. सादिक लाड (वर्धा), अर्जुन बाग९ड (औरंगाबाद) वि. वि. नितीन उमापे (मुंबई), संतोष हिरगुडे (कोल्हापूर) वि. वि. सागर राऊत (सोलापूर), सोमनाथ माळी (धुळे), संजय लोहारे (नागपूर), राजेश पोले (परभणी) वि. वि. शेखर राठोड (उस्मानाबाद), सूरज यादव (ठाणे) वि. वि. अक्षय आंबरडेकर (मुंबई), सौरभ राऊत (औरंगाबाद शहर) वि. वि. विनायक चव्हाण (मुंबई शहर), पंकज मोकारे (अमरावती) वि. वि. बाबा इंगवे (सोलापूर), शिवराज हाके (लातूर) वि. वि. आदेश रायकर (अहमदनगर), विवेक भंडारी (ठाणे जि.) वि. वि. प्रफुल्ल पिंपळकर (चंद्रपूर, अनुपस्थित), सागर पारकर (पुणे) वि. वि. विनायक नाईक (पिंपरी चिंचवड).उद्घाटन सोहळ्यात आकर्षण असणार सिने अभिनेते संजय दत्त, अरबाज खानमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आझाद मैदानावर सायंकाळी ५ वाजता रंगणार आहे. या सोहळ्यात सिनेअभिनेता संजय दत्त आणि अरबाज खान यांची प्रमुख उपस्थिती हे आकर्षण असणार आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, संयोजन समितीचे अध्यक्ष व राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, वरिष्ठ उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते, सर्जेराव शिंदे, स्पर्धा संयोजन समितीचे सचिव डॉ. दयानंद भक्त, विलास कथुरे आदी उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :JalanaजालनाWrestlingकुस्तीMaharashtra Kesriमहाराष्ट्र केसरी