शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम पावसाचा तिसरा प्रयोग पावला; घनसावंगी तालुक्यात रिमझीम बरसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 23:59 IST

जालना , औरंगाबाद : मराठवाड्यातील कमी पर्जन्यमान असलेल्या भागांत कृत्रिम पावसाचा प्रयोग ९ तारखेला सुरु झाला. मंगळवारी प्रयोगाचा बारावा ...

जालना, औरंगाबाद : मराठवाड्यातील कमी पर्जन्यमान असलेल्या भागांत कृत्रिम पावसाचा प्रयोग ९ तारखेला सुरु झाला. मंगळवारी प्रयोगाचा बारावा दिवस होता. या बारा दिवसांत फक्त तीन दिवस विमान प्रयोगासाठी हवेत झेपावले. मंगळवारी विमानाने घनसावंगी परिसरात रसायनांची (एरोसोल्स) फवारणी केली आणि अखेर रिमझिम का होईना पाऊस बरसला. प्रत्यक्ष किती पाऊस झाला याचा अहवाल मात्र रात्रीउशिरापर्यंत विभागीय प्रशासनाकडून मिळाला नाही.९ आॅगस्ट रोजी कृत्रिम पावसासाठी ‘ट्रायल रन’ घेण्यात आले. त्या दिवशी पश्चिम भागासह वैजापूर (जि. औरंगाबाद) परिसरात एका ढगावर फवारणी केली. मात्र, पाऊस झाला नाही. त्यानंतर एकच दिवस प्रयोग झाला. दोन दिवस फवारणीचे विमान विश्रांतीसाठी पुणे आणि दिल्लीला नेण्यात आले. दरम्यान १७ आॅगस्ट रोजी परदेशातून विमान औरंगाबादेत आले. सोमवारी काही परवानग्या न मिळाल्याने विमान उड्डाण घेऊ शकले नाही. रविवारी दिवसभर प्रयोगाबाबत शास्त्रज्ञांनी चर्चा केली.मंगळवारी सी-डॉप्लर रडारवरून मिळालेल्या छायाचित्रांच्या आधारे उड्डाण घेण्याचा निर्णय झाला. दुपारी पुन्हा बैठक झाल्यानंतर सायंकाळी जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात पाणीदार ढग असल्याचे दिसून आले. पाच वाजेच्या सुमारास विमानाने उड्डाण घेत साडेपाच वाजेच्या सुमारास ढगांवर रसायनांची फवारणी केली. ढगावर रसायनांची फवारणी केल्यानंतर १५ मिनिटे ते एक तासाने पाऊस पडतो. त्यानंतर पाऊस पडला की नाही, याची नोंद प्रशासनाकडे झालेली नाही. बुधवारी पाऊस झाला की नाही, याची माहिती मिळेल, असे नोडल आॅफिसर तथा विभागीय उपायुक्त सतीश खडके यांनी सांगितले.घनसावंगी तालुक्यातील रूई, भार्डी खापरदेव हिवरा आणि वडेकाळेगाव परिसरात ग्रामस्थांनी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान हे विमान पाहिले. या विमानाच्या घिरट्यानंतर रिमझिम पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.गेल्या पंधरा दिवसांपासून जालना जिल्ह्यात पावासाने दडी मारली आहे. अर्धा पावसाळा संपल्यावरही सरारीच्या ५० टक्केही पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सरकारकडून मराठवाडा विभागात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी आवश्यक ती तयारी केली होती. परंतु या-ना त्या कारणाने यालाही विलंब होत गेल्याने शेतकऱ्यांच्या या कृत्रिम पावसावरील विश्वासही उडाला होता. मंगळवारी सायंकाळी घनसावंगी तालुक्यातील काही गावांत पाऊस झाल्याने शेतकºयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अनेकांनी विमान पाहिलेही परंतु हे विमान कृत्रिम पावसाचेच होते काय याबद्दल शंका होती.यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांना विचारले असता, त्यांनी ते विमान कृत्रिम पावसाचेच असल्याचे सांगितले. आम्हालाही औरंगाबादेतून जिल्ह्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग झाल्याचे सांगण्यात आल्याचे वायाळ म्हणाले.‘त्या’ प्रकरणाची दखलविभागात काही ठिकाणी ढग दाटून येत आहेत. त्यामुळे विमान उड्डाण घेण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास प्रशासनाला आहे. कृत्रिम पावसाला यश मिळावे, विभागात पाऊस पडावा, अशी सर्वसामान्यांची भावना झाली आहे. सोमवारी दिवसभर मराठवाड्यातून आयुक्तालयातील लॅण्डलाईनवर कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी फोन येत होते. सोशल मीडियात एका एसएमएसमुळे हा सगळा प्रकार घडला होता. याप्रकरणाची प्रशासनाने गभीर दखल घेतली आहे.

टॅग्स :JalanaजालनाRainपाऊस