चार तासात चोरटे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:34 IST2018-12-09T00:34:11+5:302018-12-09T00:34:23+5:30
सकलेचानगर मधिल मोरेश्वर सप्लार्यसचा कडीकोंडा तोडून चाळीस हजार रूपये रोख आणि सीसीटीव्ही कॅमेरा तसेच त्याच्याशी संबंधित डिव्हीडी लंपास केल्याचा प्रकार घडला.

चार तासात चोरटे जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सकलेचानगर मधिल मोरेश्वर सप्लार्यसचा कडीकोंडा तोडून चाळीस हजार रूपये रोख आणि सीसीटीव्ही कॅमेरा तसेच त्याच्याशी संबंधित डिव्हीडी लंपास केल्याचा प्रकार शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने जलदगतीने तपासाची चक्रे फिरवून दोन जणांना अवघ्या चार तासात अटक केली.
सकलेचानगरमध्ये मोरेश्वर सप्लायर्सचे कार्यालय आहे. हे एका सत्ताधारी बड्या नेत्याशी संबंधित असल्याने येथे चोरी झाल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती पोलीसांना कळताच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी अनुक्रमे शिकलकरी मोहल्ला आणि हिंदनगरमधील प्रितमसिंग छगनसिंग भोंड आणि अर्जुन प्रितमसिंग कलाणी यांना ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. सीसीटीव्हीची यंत्रणा कोणत्या नाल्यात फेकून दिली याचीही माहिती दिली. यात विशेष म्हणजे ही चोरी करण्यासाठी या दोघांनी चमडबाजारातून एक मोटारसायकल चोरून त्याचा उपयोग येण्या-जाण्यासाठी केल्याचे गौर यांनी सांगितले.