पत्नीची भेट अधुरी राहिली; सासुरवाडीजवळच दोन बाईकच्या टकरीत तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 19:21 IST2022-04-28T19:10:01+5:302022-04-28T19:21:44+5:30

समोरील बाईकवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत

The wife's meeting was incomplete; A youth was killed in a collision between two bikes near Sasurwadi | पत्नीची भेट अधुरी राहिली; सासुरवाडीजवळच दोन बाईकच्या टकरीत तरुणाचा मृत्यू

पत्नीची भेट अधुरी राहिली; सासुरवाडीजवळच दोन बाईकच्या टकरीत तरुणाचा मृत्यू

भोकरदन ( जालना) : माहेरी गेलेल्या पत्नीला भेटण्यासाठी निघालेल्या पतीचा दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी २ वाजेच्या सुमारास  तालुक्यातील बरंजळा लोखंडे गावाजवळ घडली. दत्ता गणपत सहाणे ( 32 ) असे मृत तरुणाचे नाव आहे. 

निमगाव येथील दत्ता सहाणे यांची पत्नी बरंजळा साबळे या माहेरी गेली आहे. आज दुपारी पत्नीला भेटण्यासाठी दत्ता बाईकवर ( क्रमांक एम एच 21 पीएम 1709 ) घरातून निघाले. दरम्यान, पत्नीचे माहेर बरंजळा लोखंडे गावाजवळच दत्ताची बाईक समोरून येणाऱ्या बाईकला धडकली. यात दत्ताचा जागीच मृत्यू झाला.

तर दुसऱ्या बाईकवरील (एम एच 21 ऐ डब्लू 9059 ) संतोष लोणकर व नामदेव आदमाणे हे गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर जालना येथे उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस कर्मचारी बी जे लहाने, ए. यु शेख, ए. डी गवळी यांनी धाव घेत पंचनामा केला. 
 

Web Title: The wife's meeting was incomplete; A youth was killed in a collision between two bikes near Sasurwadi