शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
3
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
4
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
5
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
6
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
7
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
8
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
9
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
10
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
11
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
12
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
13
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
14
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
15
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
16
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
17
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
18
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
19
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
20
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला

आकाशच कोसळले! दहावीचा पेपर दिला, बाहेर येताच मुलीला कळले आई जग सोडून गेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 19:00 IST

आई दवाखान्यात असताना मुलीची सुरु होती दहावीची परीक्षा 

- फकिरा देशमुखभोकरदन ( जालना): येथील वर्षा सारंग चौधरी ( 41) यांचा ब्रेन स्ट्रोकने रविवारी (दि. १९) मृत्यू झाला. ब्रेन डेड असल्याने नातलगांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्याने पाच जणांना जीवदान मिळाले. मात्र, आजारपण आणि मृत्यूची वार्ता दहावीच्या परीक्षा सुरु असलेल्या त्यांची मुलगी गायत्रीला देण्यात आली नव्हती. आज गायत्रीचा विज्ञान विषयाचा पेपर होता. पेपर देऊन बाहेर येताच गायत्रीला आई जग सोडून गेल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर गायत्रीस थेट अंत्यसंस्कार स्थळी नेण्यात आले. 

या बाबतची माहिती अशी की, भोकरदन येथील सारंग चौधरी यांचा मुलगा देव हा सातारा येथे एमबीबीएस प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. त्याला सोडण्यासाठी सारंग चौधरी, पत्नी वर्षासह अक्कलकोट, पंढरपूर असे देवदर्शन करत 14 मार्च रोजी सातारा येथे पोहचले. मात्र अचानक वर्षा यांना त्रास जाणवू लागला. स्थानिक हॉस्पिटलमधील उपचारानंतर त्यांना पुणे त्यानंतर 16 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . येथे उपचारानंतर डॉक्टरांनी वर्षा यांना ब्रेन डेड घोषित केले. नातेवाईकाने अवयदानाचा निर्णय घेतला. या निर्णयाने पाच जणांना जीवदान मिळाले आहे. त्यानंतर आज त्यांचे पार्थिव भोकरदन येथे नेण्यात आले. दरम्यान, वर्षा यांची मुलगी गायत्रीची दहावीची परीक्षा सुरु आहे. त्यामुळे गायत्रीला आईचे आजारपण आणि मृत्यूची वार्ता देण्यात आली नव्हती. आज गायत्रीचा विज्ञान विषयाचा पेपर होता. दुपारी पेपर झाल्यानंतर बाहेर येताच गायत्रीस आईच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. 

आई दवाखान्यात असताना मुलीची सुरु होती परीक्षा गायत्रीला आईची तब्येत ठीक नाही अशी माहिती होती. नातेवाईकांनी तिला आईची तब्येत बरी असून तून परीक्षा झाल्यास तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये जा असे सांगितले होते. मात्र, आज पेपर देऊन बाहेर येताच आई जग सोडून गेल्याचे कळताच तिच्यावर आभाळच कोसळले. दुपारी शोकाकुल वातावरणात वर्षा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आईची शेवटची भेट होऊ शकली झाली नाही म्हणून गायत्रीने हंबरडा फोडला. हे दृश्य पाहून उपस्थितांनी देखील अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

टॅग्स :Jalanaजालनाssc examदहावी