नात्याला काळीमा, दारूच्या नशेत जावयानेच केला सासूवर अत्याचार

By दिपक ढोले  | Updated: June 8, 2023 19:05 IST2023-06-08T19:04:32+5:302023-06-08T19:05:53+5:30

वृद्धेने प्रतिकार करण्याच्या प्रयत्न केला असता, तिला मारहाण केली.

The relationship was ruined, the mother-in-law was abused by the drunk son-in-law | नात्याला काळीमा, दारूच्या नशेत जावयानेच केला सासूवर अत्याचार

नात्याला काळीमा, दारूच्या नशेत जावयानेच केला सासूवर अत्याचार

जालना : दारूच्या नशेत ३८ वर्षीय जावयाने ६५ वर्षीय वृद्ध सासूरवर अत्याचार केल्याची घटना चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार झालेल्या जावयाचा पोलिस शोध घेत आहेत. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

चंदनझिरा पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात एक ६५ वर्षीय महिला आपल्या मुलीकडे राहते. पीडित महिलेची मुलगी व जावई एका व्यक्तीच्या शेतात राखणदार म्हणून काम करतात. बुधवारी रात्री पीडित वृद्ध महिलेची मुलगी नातेवाइकांकडे गेली होती. तर पीडित महिला गर्मी असल्याने घराबाहेर लिंबाच्या झाडालाखाली झोपली होती. रात्री बारा वाजेच्या सुमारास पीडित महिलेचा जावई हा दारूच्या नशेत घरी आला. वासनांध झालेल्या जावयाने झाडाखाली झोपलेल्या वृद्ध सासूवरच अत्याचार केला. वृद्धेने प्रतिकार करण्याच्या प्रयत्न केला असता, तिला मारहाण केली. 

दरम्यान, सकाळी हा प्रकार पीडित महिलेने घरी आलेल्या आपल्या मुलीला सांगितला. माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांसह पिंक मोबाइल पथकाच्या उपनिरीक्षक अर्चना पाटील पथकासह घटनास्थळी पोहोचल्या. पोलिसांनी पंचनामा करून पीडित महिलेस रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून चंदनझिरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी फरार झाला असून, पोलिस त्याच्या शोधासाठी पथक रवाना केल्याची माहिती उपनिरीक्षक पाटील यांनी दिली.

Web Title: The relationship was ruined, the mother-in-law was abused by the drunk son-in-law