जालन्यात दोन कुटुंबांतील जुन्या वादातून गोळीबार; एक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 12:56 IST2022-03-03T12:54:34+5:302022-03-03T12:56:27+5:30

रामनगर येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे

The dispute between the two families escalated; One person was injured in the shooting from an old quarrel | जालन्यात दोन कुटुंबांतील जुन्या वादातून गोळीबार; एक जण जखमी

जालन्यात दोन कुटुंबांतील जुन्या वादातून गोळीबार; एक जण जखमी

जालना : जुन्या भांडणातून जालना तालुक्यातील रामनगर येथे आज सकाळी गाळीबार झाला. यात एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रामनगर येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

रामनगर येथील जोशी व शेजूळ कुटुंबात बुधवारी सायंकाळी वादावादी झाली होती. या प्रकरणी जोशी कुटुंबाने मौजपुरी पोलीस ठाण्यात तक्रारदेखील दाखल केली होती. गुरुवारी सकाळी पुन्हा वादावादी झाली. त्यानंतर जोशी कुटुंबाकडून गोळीबार करण्यात आला. यात एक जण गंभीर जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

माहिती मिळताच, मौजपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि. विलास मोरे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी सदर तणाव शांत केला. सध्या रामनगर येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
 

Web Title: The dispute between the two families escalated; One person was injured in the shooting from an old quarrel