शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मुलांनी शेती वाटून घेत आईला घरातून हाकलं, तर नातू शिव्या देत अंगावर धावला

By विजय मुंडे  | Updated: June 7, 2025 20:04 IST

चार मुलांसह नातवाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

धावडा (जि. जालना) : वडिलांच्या निधनानंतर मुलांनी १० एकर शेती वाटून घेतली आणि आईच्या नावे ३१ गुंठे जमीन ठेवली. परंतु, ८० वर्षीय वृद्ध आईचा सांभाळ न करता तिला घरातून हाकलून लावल्याची घटना हिसोडा बु., ता. भोकरदन येथे घडली. या प्रकरणात वृद्धेने दिलेल्या तक्रारीवरून मुलांसह नातवाविरुद्ध शुक्रवारी पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंडित बाळा बावस्कर, भास्कर बाळा बावस्कर, अशोक बाळा बावस्कर, दशरथ बाळा बावस्कर व श्रीराम भास्कर बवस्कर (सर्व रा. हिसोडा बु.) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. कमलाबाई बाळा बावस्कर (वय ८०) यांनी पारध पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पतीच्या निधनानंतर मुलांनी जमीन आपापसात वाटून घेतली आणि आई कमलाबाई बावस्कर यांच्या नावे ३१ गुंठे ठेवली. ती जमीनही मुलेच कसतात. परंतु, त्या बदल्यात पैसे अथवा अन्नधान्यही देत नव्हते. त्यामुळे कमलाबाई बावस्कर यांनी तुम्ही माझी शेतजमीन पेरणी करता; परंतु मला काही देत नाही. यापुढे माझी शेतजमीन मी पेरेल किंवा दुसऱ्याला ठोक्याने देईन, असे सांगितले. त्यावेळी नातू श्रीराम भास्कर बावस्कर हा अंगावर धावून गेला आणि म्हातारे, आमच्याशिवाय तुला दुसरे कोण आहे. तू दुसऱ्याला शेतजमीन कसण्यासाठी दिली तर तुला जिवे मारून टाकू अशी धमकी त्याने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आजवर मजुरी करून पोट भरले; परंतु, वय झाल्याने तेही होत नाही. मुलं संभाळत नाहीत. मुलं आणि नातू त्रास देत देतात. ६ जून रोजी मुलांनी घरातून बाहेर काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कमलाबाई बावस्कर यांनी दिलेल्या तक्रारीवरून चार मुलांसह एका नातवाविरुद्ध पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि. एस. डी. माने हे करीत आहेत.

या कलमान्वये गुन्हा दाखलकमलाबाई बावस्कर यांच्या तक्रारीनुसार त्यांची चार मुले व नातवाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ कलम ११५ (२), ३५१ (२), ३५१ (३), ३ (५), ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालनपोषण आणि कल्याण अधिनियम २००७ कलम २४ नुसार पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी