शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

"मुख्यमंत्री उद्या आरक्षणावर विधानसभेत उत्तर देणार"; जरांगेंनी सांगितली 'अंतर की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 14:59 IST

तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्रात ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्याची माहिती दिली.

जालना - मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्याकडून शासनाला २४ डिसेंबरची डेडलाईन देण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा काय असावी यावर चर्चा करण्यासाठी आज अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे मराठा समाज बांधवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. समाज बांधवांशी संवाद साधून मनोज जरांगे पाटील आंदोलनाची पुढील भूमिका जाहीर केली. जरांगे यांनी आंदोलनाची दिशा ठरवण्यापूर्वी उपस्थित मराठ समाजाला विचारुनच निर्णय घेतला. त्यानुसार, आता २३ डिसेंबर रोजी पुढील घोषणा होणार आहे. 

तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्रात ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्याची माहिती दिली. तसेच, ओबीसीतूनच आम्हाला मराठा आरक्षण मिळतंय, असेही म्हटले. त्यानंतर, आजच्या बैठकीत मराठा आंदोलनाची पुढील दिशा २३ तारखेच्या बैठकीत ठरवण्यात येईल, अशी घोषणा जरांगे पाटील यांनी केली. कारण, उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेमराठा आरक्षणावर सभागृहात उत्तर देणार आहेत. दरम्यान, आजच्या बैठकीत, जरांगे यांनी अंतरवालीत जमलेल्या मराठा बांधवांना हात उंचावून तुमचं मत देण्याचं आवाहन केलं होतं. त्यास, होsss म्हणत सर्वांनी पाठिंबा दिला. 

ही लढाई बुद्धीने, युक्तीने आणि ताकदीने लढाईची आहे आणि जिंकायची आहे. त्याचं म्हणणं होतं, आम्हाला १ महिना द्या, पण त्यांच्याकडे अद्यापही ४ दिवस आहेत. त्यामुळे, आपण १ महिना वाढवून देण्याची त्यांची मागणी मान्य केली नाही. बांधवांनो ही वैऱ्याची रात्र आहे, आता आपल्याला जागं राहायचं आहे. मुख्यमंत्री उद्या म्हणजेच १८ डिसेंबर रोजी विधानसभा सभागृहात मराठा आरक्षणावर उत्तर देणार आहेत. त्यामुळे, आज आपण जो निर्णय जाहीर करणार होतो, तो आजऐवजी २३ डिसेंबर रोजी जाहीर करू, असे म्हणत जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा पुढील आठवड्यात जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले. 

५४ लाख नोंदी सापडल्या

आम्हाला जे करायचंय ते परफेक्ट करायचं आहे. आम्हाला दमायचं नाही, कारण हा शेवटचा लढा आहे. केवळ पळायचं म्हणून पळायचं नाही. आम्ही करोडोंच्या संख्येनं आंदोलन करू, कारण आमची संख्याच तेवढी आहे. आमची संख्याच या राज्यात ५० ते ५५ टक्के आहे. आमच्या लेकरांना देणार आहेत, म्हटल्यावर आम्ही घराघरातून ताकदीने येणार आहोत, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले. राज्यात ५४ लाख नोंदी सापडल्या, ज्या गेल्या ७० वर्षात सापडल्या नाहीत. हे मराठ्यांचं यश आहे. आता आम्ही कायद्याच्या चौकटीत बसलो आहोत. त्यामुळे, आम्ही ओबीसी आरक्षणात बसल्यामुळे सरकारचा सूर बदलला आहे. सरकारला आम्ही दिलेला वेळ पुरसा आहे, त्यांच्याकडे आणखी ८ दिवस  आहेत. त्यामुळे, त्यांनी आम्हाला लिहून दिलेला कागद पुन्हा वाचला तर वेळ वाढवून द्यायची गरजच पडणार नाही, असे म्हणत मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण व आंदोलनाबद्दलची भूमिका स्पष्ट केली. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील