शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

टेंभुर्णी ग्रामपंचायत : सरपंच - उपसरपंच निवड १२ फेब्रुवारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या टेंभुर्णीच्या सरपंच, उपसरपंच निवडीसाठी अखेर १२ तारखेचा मुहूर्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या टेंभुर्णीच्या सरपंच, उपसरपंच निवडीसाठी अखेर १२ तारखेचा मुहूर्त सापडला आहे. याबाबत तहसीलदारांनी शनिवारी आदेश जारी केला असून, या निवड प्रक्रियेसाठी अध्यासी अधिकारी म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जे.टी. नागरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टेंभुर्णीचे सरपंचपद मागासवर्गीय महिला संवर्गासाठी आरक्षित असल्याने या पदावर १० जागा जिंकून एकतर्फी बहुमत मिळवणाऱ्या भाजपच्या एकमेव महिला उमेदवार सुमन म्हस्के यांची निवड निश्चित मानली जात आहे. तरीही ६ जागा जिंकून विरोधी बाकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडेही एक मागासवर्गीय महिला सदस्य असल्याने वेळेवर काही धोका होऊ नये, म्हणून भाजपचे सदस्य मागील १० दिवसांपूर्वीच सहलीवर निघून गेले आहेत.

भाजपतर्फे सरपंचपदावर सुमन म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता उपसरपंचपदी कोणाची वर्णी लागते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. भाजपच्या १० सदस्यांमध्ये सलग चौथ्यांंदा निवडणूक जिंकलेले माजी सरपंच लक्ष्मण शिंदे व माजी उपसरपंच फैसल चाऊस हे दोघेच ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यामुळे या दोहोंपैकी एकाची वर्णी लागण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.

एकंदर सरपंचपदाचे नाव निश्चित झाल्यानंतर आता उपसरपंचपदी शिंदे की चाऊस, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. तरीही अवघ्या ११ महिन्यांवर आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर लक्ष ठेवून उपसरपंचपदाला न्याय देण्याचे मोठे दिव्य भाजप पक्षश्रेष्ठींना पार पाडावे लागणार आहे.