शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
8
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
9
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
10
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
11
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
12
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
13
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
14
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
15
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
16
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
17
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
18
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
19
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
20
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक संवेदनशील असावाच : कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:30 IST

जालना : शैक्षणिक वातावरणात अनेक घटना घडतात, ज्यामुळे नकारात्मक सूर येतो. परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि विद्यार्थी ...

जालना : शैक्षणिक वातावरणात अनेक घटना घडतात, ज्यामुळे नकारात्मक सूर येतो. परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि विद्यार्थी हितासाठी शिक्षकाने संवेदनशील असायलाच पाहिजे, असे मत शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी रविवारी साने गुरुजी कथामाला पदाधिकारी बैठकीत बोलताना व्यक्त केले.

जुना जालना भागातील भाग्यनगर परिसरातील संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी कथामालेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतिमा कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष डॉ. सुहास सदाव्रते, उपाध्यक्ष प्रा. दिगंबर दाते, रामदास कुलकर्णी, बी. एम. सय्यद, मीनाक्षी देशमुख, प्रा. रमाकांत कुलकर्णी, जगदीश वैष्णव, अंबादास नन्नवरे यांची उपस्थिती होती.

पुढे कुलकर्णी म्हणाले की, आज एकाच शाळेत अनुदान, विनाअनुदानासह अनेक स्तर आहेत की, ज्यामुळे शिक्षकांची मानसिकता कशी टिकेल, असा प्रश्न आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करायला शिकवितो, तोच खरा शिक्षक असतो, असे सांगून साने गुरुजींच्या संवेदनशील विचारांचा शोध घेणारा शिक्षक असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रत्यक्ष वर्गात शिकविण्यापेक्षा प्रश्न आणि समस्येत अडकलेला शिक्षक यातून सुटला पाहिजे, अशी व्यवस्था निर्माण होणे गरजेचे असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. बैठकीत अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, जालना शाखेने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. संस्कार प्रबोधिनी विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक रामदास कुलकर्णी यांनी तयार केलेल्या ऑनलाईन शिक्षण मोबाईल स्टॅण्डची शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी प्रशंसा केली. साने गुरुजी कथामालेचे पदाधिकारी पवन कुलकर्णी यांनी आभार मानले.

फोटो

जालना : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला पदाधिकारी बैठकीत हेरंब कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.