जालन्यात वऱ्हाडाने टाळ मृदंगाच्या तालावर धरला ठेका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 14:34 IST2019-03-14T14:27:19+5:302019-03-14T14:34:56+5:30
डीजेतून वाचलेली रोख रक्कम त्यांनी जिला परिषद शाळेला भेट दिली

जालन्यात वऱ्हाडाने टाळ मृदंगाच्या तालावर धरला ठेका
जालना : प्रल्हादपूर येथील गजानन रतन नामदे या युवकाचा गोळेगावात पूजा केशवराव बनकर सोबत लग्न ठरले. लग्न साध्यापद्धतीने करण्याचे दोन्ही कुटुंबाने ठरवले. यानुसार बुधवारी (दि. १३ ) मिरवणुकीत डीजे टाळून पारंपारिक टाळ-मृदंगाच्या तालावर वऱ्हाडाने ठेका धरला. तसेच लग्न समारंभात भजन सादरीकरण करून सर्व पाहुण्यांना शिवचरित्राचे वाटप करण्यात आले. यानंतर अनावश्यक असलेल्या डीजेला लागणारी रक्कम त्यांनी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली.
पहा व्हिडिओ