‘लायन्स’चा शपथविधी सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 01:25 IST2019-07-16T01:22:00+5:302019-07-16T01:25:52+5:30

लायन्स क्लब व लिओ क्लब आॅफ जालना अंतर्गत डायमंड, प्रेसिडेंट व महाराजा क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा शनिवारी मधुर बँक्वेट हॉल स्थित इंद्रप्रस्थ नगरीत उत्साहात पार पडला.

The swearing-in ceremony of 'Lions' | ‘लायन्स’चा शपथविधी सोहळा उत्साहात

‘लायन्स’चा शपथविधी सोहळा उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लायन्स क्लब व लिओ क्लब आॅफ जालना अंतर्गत डायमंड, प्रेसिडेंट व महाराजा क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा शनिवारी मधुर बँक्वेट हॉल स्थित इंद्रप्रस्थ नगरीत उत्साहात पार पडला.
यावेळी लायन्सचे विभागीय अध्यक्ष एम. जे. एफ. ला. मनोहर खालापुरे, सुदेश करवा, क्लबचे संस्थापक सुभाष देवीदान, ललित बिजावत, विजय बगडिया, सौरभ पंच, सुनील बियाणी, रमेश अग्रवाल, रूपेश बगडिया, डायमंडचे अध्यक्ष मोहन इंगळे, प्रेसिडेंटचे अध्यक्ष राजेंद्र बजाज, महाराजाचे अध्यक्ष मधुकर पवार, लिओ डायमंडचे अध्यक्ष दिनेश सिनगारे, प्रेसिडेंटचे अध्यक्ष नीलेश अचलिया, महाराजाचे अध्यक्ष सूरज पंच यांची प्रमुख उपस्थिती होती.
लायन्स क्लबचे डिस्ट. पी. डी. जी. एम. जे. एफ. ला. राजेश सुखदेवराव राऊत यांच्यासह सुभाष देविदान, मोहन इंगळे, विजय बगडिया, सुदेश करवा, ललित बिजावत, ब्रिजमोहन देवीदान, मधुकर पवार, सौरभ पंच, अ‍ॅड. सतीश तवरावाला यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ देण्यात आली. सूत्रसंचालन दीपा मुंदडा यांनी केले. तर कुशल शर्मा यांनी आभार मानले. कार्यक्रमास मोहन गुप्ता, संतोष दुधानी, विनोद रत्नपारखे, रूपाली देवीदान, जितेंद्र लखोटिया, गोवर्धन अग्रवाल, मुकेश गुप्ता, मनीष तवरावाला, बाबूराव सतकर यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.

Web Title: The swearing-in ceremony of 'Lions'