स्वाभिमानीचे शुक्रवारी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:20 IST2021-07-08T04:20:35+5:302021-07-08T04:20:35+5:30
राहुटीत डुकरांचा वावर परतूर : येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उभारलेल्या राहुटीत अनेक दिवसांपासून डुकरांचा वावर वाढला आहे. शिवाय, परिसरात ...

स्वाभिमानीचे शुक्रवारी आंदोलन
राहुटीत डुकरांचा वावर
परतूर : येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उभारलेल्या राहुटीत अनेक दिवसांपासून डुकरांचा वावर वाढला आहे. शिवाय, परिसरात अस्वच्छताही पसरली आहे. पोलीस प्रशासनातर्फे ही राहुटी या ठिकाणी उभारण्यात आली होती. मात्र, वापर नसल्याने राहुटी काढून टाकली गेली नाही.
भोकरदन येथे भाजपची निदर्शने
भोकरदन : तहसील कार्यालय परिसरात महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष मुकेश चिने, विनोद गावंडे, डॉ. चंद्रकांत साबळे, विजय पाबळे, गणेश देठे, विष्णुपंत गाडेकर, खंडू घायवट, नायब घायवट, दत्ता घायवट आदींची उपस्थिती होती.
बाभूळगाव येथे वृक्षारोपण
भोकरदन : तालुक्यातील बाभूळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावात एक हजार वृक्षलागवड करण्यात येणार आहे. मंगळवारी ग्रामस्थांना चिंच, कडूनिंब, जांभूळ, कांचन, वड आदी शंभर रोपट्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी आबाराव गाढे, मुख्याध्यापक विठ्ठल राऊत, बाळासाहेब गाढे, दिलीप गाढे, उपसरपंच रामेश्वर राऊत, ग्रामसेवक तोटावार, विशाल गाढे आदींची उपस्थिती होती.
जामखेड येथे कामगार नोंदणी अभियान
जामखेड : येथे प्रहार संघटनेच्या वतीने कामगार नोंदणी अभियान राबविण्यात आले. यावेळी बांधकाम कामगार, इतर ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी करण्यात आली. या प्रसंगी संतोष राजगुरू, जिल्हाध्यक्ष विदूर लाघडे, बाळासाहेब काळवणे, कामगार आघाडीचे राखुंडे, जामखेडचे सरपंच कुरेशी, संदीप धुळे आदींची उपस्थिती होती.
भूमिगत गटाराच्या कामाला सुरुवात
बदनापूर : बदनापूर तालुक्यातील चिखली येथील जिल्हा परिषद सदस्या द्वारकाबाई डोळस व ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने सोमवारी भूमिगत गटार योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी गणेश डोळस, उपसरपंच आबासाहेब देशमुख, सतीश देशमुख, पृथ्वीराज देशमुख, शुभम जैस्वाल आदींची उपस्थिती होती.
स्मशानभूमीची पाहणी
वालसावंगी : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतीच येथील बारी समाज स्मशानभूमीची पाहणी केली. येथील स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी परिश्रम घेणाऱ्या युवकांचे कौतुक केले. याप्रसंगी राजू कोथलकर, मनीष बोडखे, गणेश पायघन, संजय कोथळकर, किशोरकुमार फुसे, हिरालाल कोथळकर हे हजर होते.
पावसाची प्रतीक्षा
परतूर : तालुक्यात आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने नुकतीच पेरणी झालेली पिके सुकू लागली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात अल्प पावसावर शेतकऱ्यांनी केलेली लागवड कडक उन्हामुळे नष्ट होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.