Sunday Jobs Festival in Jalna .. | जालन्यात रविवारी नोकरी महोत्सव..
जालन्यात रविवारी नोकरी महोत्सव..

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहर व ग्रामीण भागातील युवकांना सतावणारी नोकरीची चिंता दूर करण्यासाठी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या अभिनव संकल्पनेतून रविवारी नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
जुना मोंढा भागातील अर्जुन खोतकर बिझनेस सेंटर परिसरात रविवारी सकाळी १०.वा. या नौकरी महोत्सवाचे उद्घाटन ना. खोतकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी गोदावरी महामंडळाचे उपाध्यक्ष भास्कर अंबेकर, माजी आ. शिवाजी चौथे, जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, ए. जे. बोराडे, संतोष सांबरे, भानुदास घुगे, पंडित भुतेकर, रावसाहेब राऊत, विष्णू पाचफुले, आत्मानंद भक्त, सविता किवंडे, भाऊसाहेब घुगे, अ‍ॅड. भास्कर मगरे, संतोष मोहिते, सभापती पांडुरंग डोंगरे, कालींदा ढगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या महोत्सवात नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्या सहभागी होणार असून, जालन्यातील तरूणांना मुंबई, पुणे औरंगाबादसह जालना शहर व परिसरात नोकरीची संधी मिळणार आहे. पाचवी ते बारावी पास, नापास, कोणत्याही शाखेतील पदवीधर, डिप्लोमा, आयटीआय व तंत्रशिक्षण घेतलेल्या सुशिक्षित तरुणांना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध होत असून, इच्छुक युवकांनी अंकुश पाचफुले, दीपक टेकाळे, उमेश पंचारिया, सागर पाटील, बाळू भिसे, सुशील भावसार, जफर खान यांच्याशी संपर्क साधावा तसेच पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिका, आधार ओळखपत्रासह मोठ्या संख्येने सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन अर्जुन खोतकर मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे.


Web Title: Sunday Jobs Festival in Jalna ..
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.