अचानक बैलगाडी तलावात ओढली गेली, शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 18:54 IST2021-09-13T18:52:58+5:302021-09-13T18:54:12+5:30

जनावरांना पाणी पाजण्यासाठी गावाजवळील तलावाकडे बैलगाडी व एक गाय घेवून गेले होते.

Suddenly the bullock cart was pulled into the lake, drowning the farmer | अचानक बैलगाडी तलावात ओढली गेली, शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

अचानक बैलगाडी तलावात ओढली गेली, शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

भोकरदन : तालुक्यातील रजाळा येथे तलावात बैलगाडीसह बुडून   शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी २:३० वाजेच्यासुमारास घडली आहे. राजू पांडुरंग साळवे ( ४७ ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, राजू साळवे जनावरांना पाणी पाजण्यासाठी गावाजवळील तलावाकडे बैलगाडी व एक गाय घेवून गेले होते. अचानक बैलगाडी तलावात ओढल्या गेली. यामुळे राजू बैलगाडीसह तुडूंब भरलेल्या तलावात बुडाले. दरम्यान, शेजारच्या शेतकऱ्यांनी तात्काळ तलावाकडे धाव घेत राजू साळवे यांना बाहेर काढले. कासरा तोडून बैलांना बाहेर काढले. 

राजू यांना तात्काळ भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्यांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई-वडील,भाऊ-बहिण, पत्नी- चार मुले, एक मुलगी असा मोठा परिवार आहे.

Web Title: Suddenly the bullock cart was pulled into the lake, drowning the farmer