शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! जालना जिल्ह्यातील २५ कोटींच्या अनुदान घोटाळ्यात ३ तलाठ्यांसह ५ गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 12:29 IST

Subsidy Scam In Jalna : न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी

जालना : अंबड, घनसावंगी तालुक्यातील २४ कोटी ९० लाख रुपये अनुदान घोटाळ्यातील तीन संशयित तलाठ्यांसह पाच जणांना आर्थिक गुन्हे शाखेने रविवारी जेरबंद केले. या प्रकरणात आजपर्यंत २० आरोपींना अटक करण्यात आली आहे. या पाच जणांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

काही आरोपींनी प्रथम जिल्हा व सत्र न्यायालय अंबड येथे अटकपूर्व जामीनसाठी अर्ज सादर केले होते. ते अर्ज फेटाळून लावल्यानंतर आरोपींनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात अर्ज दाखल केले होते. तेथेही अर्ज फेटाळलेले आहेत. ही कामगिरी प्रभारी उपाधीक्षक सिद्धार्थ माने, पोनि. मिथुन घुगे, अंमलदार गोकूळसिंग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजानन भोसले, सागर बावीस्कर, दत्ता वाघुंडे, विष्णू कोरडे, ज्ञानेश्वर खुने, रवींद्र गायकवाड, शुभम तळेकर, श्रेयस वाघमारे, पाठक मेजर, जया निकम, निमा घनघात मंदा नाटकर यांनी केली

यांना केली अटकआर्थिक गुन्हे शाखेने मंडळाधिकारी सुनील रामकृष्ण सोरमारे (३७), तलाठी बप्पासाहेब रखमाजी भुसारे (५३), तलाठी रामेश्वर नाना जाधव (४८), नेटवर्क इंजिनिअर वैभव विश्वंभर आडगावकर (३६), ऑपरेटर विजय निवृत्ती भांडवले (३४) यांना अटक केली. 

काय आहे प्रकरण?अंबड व घनसावंगी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शासनाने बाधित शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते. अंबड व घनसावंगी तालुक्यात याद्या अपलोडिंगचे कामकाज करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बोगस नावे याद्यांत अपलोड करून त्यांचे नावे आलेल्या अनुदानाची रक्कम हडपल्याच्या तक्रारी होत्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार चौकशीत २४ कोटी २० लाख ७७ हजार ८११ रुपयांचा घोटाला समोर आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Jalna Grant Scam: Five Arrested, Including Three Revenue Officers

Web Summary : Five individuals, including three revenue officers, have been arrested in Jalna district concerning a ₹25 crore grant scam. They are accused of misappropriating funds intended for farmers affected by natural disasters by uploading bogus names and embezzling the funds.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाRevenue Departmentमहसूल विभागfraudधोकेबाजी