चोरीचे मोबाईल जप्त, एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:59 IST2018-12-06T00:59:49+5:302018-12-06T00:59:55+5:30
वेगवेगळ्या ठिकाणांहून नामांकित कंपनीचे चोरून आणलेले मोबाईल विक्री करण्याच्या हेतुने रेल्वेस्थानक भागात ग्राहकांच्या शोधात असलेल्या एकाला मंगळवारी रात्री अटक केली

चोरीचे मोबाईल जप्त, एकास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वेगवेगळ्या ठिकाणांहून नामांकित कंपनीचे चोरून आणलेले मोबाईल विक्री करण्याच्या हेतुने रेल्वेस्थानक भागात ग्राहकांच्या शोधात असलेल्या एकाला मंगळवारी रात्री अटक केली. त्याच्याकडून सहा महागडे मोबाईल जपत केले. ज्यांची किंमत ७० हजार रुपयांच्या घरात जात असल्याची माहिती एडीएस पथकाचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांनी दिली.
गोपनीय माहिती मिळाल्यानुसार यशवंत जाधव यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सांगून रेल्वेस्थानक भागात सापळा लावला. यावेळी विकास उर्फ खारट अशोक गायकवाड, (रा. लालबाग जालना) ताब्यात घेतले आहे. यांच्याकडून सहा मोबाईल पंचासमक्ष जप्त केले आहेत. हे मोबाईल नेमके कोठून चोरून आणले, याची विचारपूस एडीएसकडून केली जात असून, त्यांच्याकडून आणखी मोबाईल चोरीचे प्रकार उघडकीस येणार असल्याचे सांगण्यात आले.
जुना जालन्यातील आठवडी बाजारातून मोबाईल चोरी होण्याचे प्रकार वाढले होते. त्या भागातूनही काही मोबाईल लंपास केल्याची कबुली गायकवाड यांनी दिल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणी आरोपीविरूद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत जाधव, जमादार ज्ञानदेव नागरे, नंदू खंदारे, किरण चव्हाण, नंदकिशोर कामे, आकाश कुरील यांनी यशस्वी केली.