जालन्यात विशेष कृती दलाचा जुगार अड्ड्यावर छापा ; ९ जुगारी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 19:08 IST2018-11-29T19:07:35+5:302018-11-29T19:08:21+5:30

जवाहरबाग येथील जुगार अड्ड्यावर विशेष कृती दलाच्या पथकाने छापा टाकत ९ जणांना ताब्यात घेतले.

Special scouds raid on gambling points in Jalna; 9 gambler arrested | जालन्यात विशेष कृती दलाचा जुगार अड्ड्यावर छापा ; ९ जुगारी अटकेत

जालन्यात विशेष कृती दलाचा जुगार अड्ड्यावर छापा ; ९ जुगारी अटकेत

जालना : शहरातील जवाहरबाग येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर विशेष कृती दलाच्या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकत ९ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह २२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गणेश महेश बिराजदार (रा. जवाहरबाग), अनिल गोविंद काळे (रा. मोदीखाना), सुभाष बाबुराव क्षीरसागर (रा. पंचशील दवाखान्या जवळ) शेख शब्बीर शे. छोटुमीया (रा. मुर्तीबेस), महेश विठ्ठ्ल बिराजदार (रा. जवाहरबाग), शंकर प्रल्हाद खंदारे (रा. नाथबाब मंदीर छाईपुरा), पुनमचंद रामचंद्र सतपुरीये (रा. जवाहरबाग), दिनेश गणेशलाल मंडोर (रा. जवाहरबाग), विजय जानकीराम देवडे (रा. जवाहरबाग) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नावे आहेत. 

विशेष कृती दलाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांना माहिती मिळाली की, जवाहरबाग येथे काही लोक पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळत आहे. या माहितीवरुन पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत ९ जणांना ताब्यात घेतले.  त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम असा २२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. यशवंत जाधव, कर्मचारी सचिन आर्य, श्रीकुमार आडेप, चालक वानखेडे यांनी केली.

Web Title: Special scouds raid on gambling points in Jalna; 9 gambler arrested