सोयाबीन उगवेना, युरियाची टंचाई; हिरवी स्वप्न भंगण्याची भीती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 08:03 PM2020-06-24T20:03:21+5:302020-06-24T20:05:58+5:30

पेरणी केलेल्या पिकांना आता वाढीसाठी पावसाची गरज आहे. 

Soybean not germinate, urea scarcity; Fear of breaking the green dream | सोयाबीन उगवेना, युरियाची टंचाई; हिरवी स्वप्न भंगण्याची भीती 

सोयाबीन उगवेना, युरियाची टंचाई; हिरवी स्वप्न भंगण्याची भीती 

Next
ठळक मुद्देबळीराजाचे डोळे आभाळाकडे  शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

जालना :  जालना जिल्ह्यात पूर्व मोसमी पाऊस जोरदार झाला तसेच मृग नक्षत्राने देखील प्रारंभी चांगली हजेरी लावून शेतकºयांचा उत्साह वाढविला होता. परंतु गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकºयांची हिरवी  स्वप्न भंगण्याची भीती निर्माण झाली असून, जिल्ह्यात मंगळवार पर्यंत जवळपास ६० टक्के पेरणी उरकली असून, आता पावसाची नितांत गरज निर्माण झाली आहे. 

जिल्ह्यात खरीप हंगाचे क्षेत्र हे एकूण पाच लाख ७० हजार हेक्टर आहे. त्यात सोयाबीन, कपाशी, तूर आदींची मोठ्या प्रमाणावर पेरणी शेतकºयांनी सुरूवातीच्या पावसातच केली. यंदा हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला असून, त्यानुसार त्याचा श्रीगणेशाही झाला होता. गेल्यावर्षी अत्यल्प पाऊस, नंतर अवकाळीचा फटका यामुळे खरीप आणि रबी हंगाम असे दोन्ही शेतकºयांच्या हातातून गेले होते. त्यामुळे यंदा चांगला पाऊस पडून पिके चांगली येतील या आशेवर शेतक-यांनी कडक उन्हाची तमा न बाळगता शेतं पेरण्यासाठी तयार करून ठेवली होती. 

पूर्वमोसमी पाऊस आणि नंतर मृगाच्या सरींनी जोरदार हजेरी लावली. काहींच्या शेतात पाणी घुसल्याने केलेली पेरणी वाहून गेली. तर काही भागात समाधानकार पाऊस पडून बियाणांनी जमनितून डोके वर काढले होते. त्यामुळे शेतात शेतक-यांना पुन्हा नवीन उमेद दिसत होती. परंतु गेल्या आठ दिवसां पासून पावसाने डोळे वटारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खºया अर्थान यंदा जून महिन्यात चांगला पाऊस झाला असून, जूनची सरासरी देखील पावसाने ओलांडली आहे. असे असतांनाच नंतर कडक उन पडल्याने तापमानात वाढ होऊन जमिनितील ओल सुकली आहे. यामुळे पेरणी केलेल्या पिकांना आता वाढीसाठी पावसाची गरज आहे. 

क्षमता तपासली
जिल्ह्यात यंदा कृषी विभागाने यंदा खरीपाची तयारी करण्यासाठी कंबर कसली होती. मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची लागवड होणार हे माहित असल्याने शेतकºयांनी त्यांच्या घरात असलेली बियाणे वापरण्यावर भर दिला आहे. या घरातील बियाणांची उगवण क्षमता तपासणीसाठी जवळपास एक हजार गावांमध्ये विशेष उपक्रम कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी राविला. त्याचे रिपोर्ट चांगले असून, जवळपास ६० टक्के बियाणांची उगवण क्षमता ही चांगली असल्याचे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान काही खाजगी कंपन्या आणि महाबीजच्या बियाणांची उगवन क्षमता चांगली नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती हाती आली आहे.

Web Title: Soybean not germinate, urea scarcity; Fear of breaking the green dream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.