Soon beautification of the square | चौकाचे लवकरच सुशोभीकरण

चौकाचे लवकरच सुशोभीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सावरकर चौकात बुधवारी आदरांजली वाहण्यात आली. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर चौकाचे लवकरच सुशोभीकरण हाती घेण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली. सावरकरांचे कार्य कोणीही विसरू शकत नाही. देशातील सर्वच महापुरूषांनी देश स्वतंत्र करण्यासाठी सोसलेल्या हालअपेष्टा वादातीत आहेत. त्यांचे स्मरण नियमित झालेच पाहिजे, असेही नगराध्यक्षा गोरंट्याल म्हणाल्या
यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, उद्योजक रमेशभाई पटेल, पारसनंद यादव आदींची प्रमुख उपस्थिती होती. उपनराध्यक्ष राजेश राऊत, पारसनंद यादव यांनीही मनोगत व्यक्त करून अभिवादन केले. यावेळी अमित कुलकर्णी, डॉ.दिलीप लाड, सुमित कुलकर्णी, गणेश लोखंडे, अ‍ॅड. विलास कुलकर्णी, प्रथमेश कुंटे, जगन्नाथ कातारे, सुरेश मुळे, सिद्धू पिंपरकर, गोपी मोहिदे, संकेत मोहिदे, सौरभ पाठक, अमोल देशमुख, किशोर माधवले, अक्षय जैन, धनंजय क्षीरसागर, कृष्णा उपरे, कृष्णा दंडे, राहुल मुळे, शुभम कौडगावकर आदींची उपस्थिती होती.

Web Title: Soon beautification of the square

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.