शेतात झोपलेल्या शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 17:54 IST2019-06-05T17:53:27+5:302019-06-05T17:54:53+5:30
उपचारासाठी जालन्याला घेवून जात असतांना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.

शेतात झोपलेल्या शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
राजूर (जालना ) : रात्री झोपेत असतांना सर्पदंश होवून भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव थोटे येथील शेतकरी दादाराव गणपत थोटे (५६) यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.
दादासाहेब थोटे शेतात कुटूंबियासह घर करून राहत होते. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे घराच्या बाहेर अंगणात झोपले होते. मध्यरात्री अचानक त्यांना सर्पदंश झाला. झोपेत काही कळाले नाही. मात्र वेदना होत असल्याने त्यांनी उठून पाहिले असता त्यांना सर्पदंश झाल्याने समजले. थोटे यांना उपचारासाठी जालन्याला घेवून जात असतांना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. बुधवारी सकाळी पिंपळगांव थोटे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी राजूर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे.