घरकुल मंजूर झाल्याचे सांगत भामट्याचा सहा महिलांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:26 IST2019-01-02T00:26:14+5:302019-01-02T00:26:40+5:30
तुम्हाला घरकुल मंजूर झाले आहे, त्यासाठी तुमच्या पतीने पैसे व दागिने सांगितले आहे, असे सांगून एका भामट्याने शहरातील विवाहित ६ महिलांना ३३ हजार ६०० रुपयाला गंडा घातल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.

घरकुल मंजूर झाल्याचे सांगत भामट्याचा सहा महिलांना गंडा
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : तुम्हाला घरकुल मंजूर झाले आहे, त्यासाठी तुमच्या पतीने पैसे व दागिने सांगितले आहे, असे सांगून एका भामट्याने शहरातील विवाहित ६ महिलांना ३३ हजार ६०० रुपयाला गंडा घातल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.
शहरातील रफियाबी शेख मोबीन (२५) रा.महात्मा फुलेनगर धनगरवाडी नवे भोकरदन ही महिला घरात एकटी असतांना चोरट्याने घरी जाऊन पिण्यासाठी पाणी मागितले व त्यानंतर तुम्हाला घरकुल मंजूर झाले आहे. तुमच्या पतीने यासाठी पैसे व दागिने मागितले आहे अशी थाप मारली. महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी तुमच्या पतीला फोन लावण्याचे नाटक केले. आपल्या पतीने पाठविले असेल यावर विश्वास ठेवून सदर महिलेने कानातील कर्णफूले, २२ हजार रूपयांचे सेवनपीस, चांदीचे फुलतोडे आणि दहा हजार रुपये रोख असा ३३ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल घेऊन फरार झाला. पती घरी आल्यानंतर रफिया शेख यांनी याची माहिती दिली. मात्र मी कोणालाच घरी पाठविले नाही. अशी माहिती पत्नीला दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रफीयाबी शेख यांनी भोकरदन पोलीस तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक धानेश्वर साखळे तपास करत आहेत.