शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

केवळ आठ महिन्यांत दाखल झाले ५०० गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:04 IST

अंबड तालुक्यातील गोंदी पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हेगारीत वाढ झाली असून, आठ महिन्यांत विविध प्रकारचे तब्बल ५०० गुन्हे दाखल झाले आहेत.

इरफान सय्यद ।लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : अंबड तालुक्यातील गोंदी पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हेगारीत वाढ झाली असून, आठ महिन्यांत विविध प्रकारचे तब्बल ५०० गुन्हे दाखल झाले आहेत. विशेषत: दाखल असलेल्या चोऱ्या, घरफोड्यांमधील काहीच प्रकरणांचा उलगडा झाला असून, इतर प्रकरणांचा तपास गुलदस्त्यात आहे.गोंदी पोलीस ठाण्यांतर्गत तिर्थपुरी (ता. घनसावंगी), शहागड (ता.अंबड) येथे दोन पोलीस चौकी आहेत. तर ठाण्यांतर्गत शंभर ते सव्वाशे किलोमीटर हद्दीत ९२ गावे आहेत. इतका मोठा व्याप असतानाही ठाण्याच्या दिमतीला एकच शासकीय गाडी आहे. चालू वर्षात गोंदी पोलीस ठाणे हद्दीतील विविध प्रकारच्या घटनांचे ४९४ गुन्हे दाखल झाले आहेत. यातील ३९४ गुन्हे उघडकीस आले आहेत. १०० गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे. अपघात चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.गोंदी ठाणे वगळता तीर्थपुरी, शहागड पोलीस चौकीला २२ गावे आहेत. मात्र, शहागड पोलीस चौकीतील नादुरूस्त जीप दुरूस्त होऊन परत आलेली नाही. त्यामुळे शहागड पोलिसांची पेट्रोलिंग बंद आहे. वाहन नाही, गस्त नाही, त्यामुळे पोलिसांचा वचक कमी होत असून, चोरट्यांना संधी मिळत आहे. आज या गल्लीत तर उद्या दुस-या गल्लीत चोरटे आल्याच्या चर्चेला उधाण येत असून, घडणा-या घटनांमुळे दहशत वाढत आहे. त्यामुळे शहागड चौकीसाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्याची गरज व्यक्त होत आहे.एक निरीक्षक, दोन उपनिरीक्षकगोंदी पोलीस ठाण्यात एक पोलीस निरीक्षक व दोन उपनिरीक्षक आहेत. शहागडसह परिसरात एखादी घटना घडली तर गोंदी पोलीस ठाण्यात कळवून ठाण्यातून वाहन येईपर्यंत अधिकारी, कर्मचा-यांना वाट पाहावी लागते. तोपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो. तसेच काही वेळा खाजगी वाहन वापरले जाते.चोरटेसाधतात पहाटेची वेळशहागडसह परिसरात एक, अंकुशनगरला येडशी-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर एक, कुरणला एक दरोडा, तसेच तीन चो-या झाल्या आहेत. तर नागरिक सतर्क राहिल्याने अनेकवेळा चोर पळाल्याची परिसरात चर्चा आहे. या सर्व घटना पहाटे एक ते तीन वाजण्याच्या दरम्यान घडल्या आहेत.वरिष्ठांनी लक्ष देण्याची होतेय मागणीशहागड पोलीस चौकीच्या हद्दीत वाढलेल्या चो-यांसह इतर घटनांमध्ये वाहन नसल्याने पोलिसांची गैरसोय होत आहे. रात्रीची गस्त बंद पडली आहे. येथील बसस्थानक परिसर, बोगदा व इतर ठिकाणी चोर दडी मारून बसतात. पहाटे एक ते तीनच्या दरम्यान चो-या केल्या जात आहेत. त्यामुळे शहागड चौकीला एक स्वतंत्र वाहन, वाढीव कर्मचारी देऊन रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी सय्यद तारेख, लक्ष्मण धोत्रे, इकबाल शेख, श्रीरंग मापारी, अपसर शेख, शफीक तांबोळी, गणेश पागीरे, संतोष जाधव, परमेश्वर जवणे आदींनी केली आहे.

टॅग्स :theftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस