शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जालना बाजारपेठेत डाळीमधील तेजी भविष्यातही कायम राहण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 12:17 IST

बाजारगप्पा : जालना बाजारपेठेत सोयाबीनची आवक आता घटली असून, डाळीच्या भावातील तेजी मात्र, कायम आहे.

- संजय देशमुख (जालना)

जालना बाजारपेठेत सोयाबीनची आवक आता घटली असून, डाळीच्या भावातील तेजी मात्र, कायम आहे. ही तेजी आणखी काही महिने राहील, असे जाणकारांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजार समितीतील अन्नधान्याची आवक ४० टक्क्यांनी घटल्याचे चित्र आहे. दरम्यान दोन वर्षांपूर्वी डाळीचे बंपर उत्पादन झाले होते. त्यावेळी सरकारने डाळींची निर्यात बंद करून ती नाफेड तसेच राज्य सरकारच्या मार्फत खरेदी केली होती. शासनाकडे जवळपास ३० लाख टन डाळींचा साठा होता, तो आता पाच लाख क्विंटलवर आला आहे. तसेच यंदा पावसाने दगा दिल्याने तूर, हरभऱ्याचे उत्पादन नगण्य होणार असल्यानेदेखील डाळींचे भाव हे वाढतच राहतील, असे सांगण्यात आले.

गेल्या सहा महिन्यांचा विचार करता यंदा दिवाळीतही बाजारपेठेतील डाळी वगळता अन्य अन्नधान्यात तेजी आलेली नव्हती. मालाला ज्याप्रमाणे उठाव असायचा तोदेखील यंदा दिसून आला नाही. बाजारपेठेत सध्या ज्वारी, बाजरीची आवक बऱ्यापैकी आहे. मोसंबीची आवक बऱ्यापैकी असली तरी, भाव नसल्याने शेतकऱ्यांची नाराजी आहे. मोसंबीला तेलंगणा, हैदराबादमध्ये मागणी बऱ्यापैकी आहे. भाज्यांनाही उठाव नसल्याचे आठवडी बाजारात दिसून आले. भेंडी आणि शिमला मिरचीच्या भावामध्ये किंचित वाढ दिसून आली.

मोंढ्यात गहू २१०० ते २७००, ज्वारी २४०० ते ३०००,  बाजरी १४०० ते २३००, मका १४०० ते १५२४, तूर ४४०० ते ५०००, चना ३८०० ते ४३००, सोयाबीन ३३२५ ते ३३५०, मक्याची आवक ३ हजार क्विंटल, सोयाबीनची आवक केवळ १००० क्विंटल असून, तूर अद्यापही आलेली नाही. ज्वारी, बाजरी, हरभरा ५०० क्विंटल आहे. साखरेचे भाव ३२२० ते ३३०० रुपये क्विंटल असून, अनेक कारखान्यांना गाळपाचा परवाना नसतानाही त्यांनी साखरेचे उत्पादन सुरू केले आहे. कोल्हापूर, सांगली, कर्नाटकातून इंडियन शुगर, तसेच अनेक बड्या कारखान्यांची साखर बाजारपेठेत दाखल झाली आहे. 

यंदा दुष्काळामुळे डाळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे.घटल्याने डाळींचा साठा करण्याकडे व्यापाऱ्यांचा कल दिसून येत असल्याने खरेदीत तेजी आली आहे. आगामी तीन ते चार महिन्यांत डाळींच्या भावामध्ये तेजी अपेक्षित असल्याचे बोलले जाते. सरकारकडे असलेल्या डाळीच्या साठ्याची दोन वर्षाची मर्यादा आता संपत चालल्याने डाळींचा दर्जा घसरत आहे, त्यामुळे ही डाळ आता गोदामातून कशी बाहेर काढता येईल या विचारात शासकीय यंत्रणा असल्याचे सांगण्यात आले. ज्वारी एक हजार तीनशे रुपयांवरूनथेट दोन हजार चारशेरुपयांवर पोहोचली आहे.

जालना जिल्हा मोसंबीचे आगर म्हणून ओळखल्या जाते. सध्या चांगल्या मोसंबीला २० हजार ते २६ हजार रुपये प्रतिटन भाव मिळत आहे. तर मध्यम स्वरुपाच्या मालाला १५ ते २० हजार रुपये टन भाव मिळत आहे. दिल्ली, राजस्थान, कोलकाता या भागातही मोसंबीला मागणी असल्याची माहिती मोसंबी अडत असोसिएशनचे अध्यक्ष नाथा पाटील घनघाव यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMarketबाजार