लघू व मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट

By Admin | Updated: May 1, 2015 00:49 IST2015-05-01T00:40:50+5:302015-05-01T00:49:09+5:30

जालना : यंदा झालेल्या अत्यल्प पावसाचा मोठा परिणाम जलसाठ्यांवर झाला आहे. जिल्ह्यातील लघू व मध्यम प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे.

Shortage of short and medium plant water storage | लघू व मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट

लघू व मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट


जालना : यंदा झालेल्या अत्यल्प पावसाचा मोठा परिणाम जलसाठ्यांवर झाला आहे. जिल्ह्यातील लघू व मध्यम प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे. टक्केवारी पाहता हा साठा पावसाळ्यापर्यंत पुरेल याची शाश्वती नाही. मध्यम प्रकल्पांत ८ तर लघूमध्ये ३ टक्के पाणीसाठा आहे.
यंदा सरासरीपेक्षाकही कमी पाऊस झाला. यामुळे पिकांची तर वाताहर झालीच शिवाय जलसाठ्यांमध्येही समाधानकारक पाणीसाठा झाला नाही.
परिणामी आज शेकडो गावांना भीषण पाणीटंचाईस तोड द्यावे लागत आहे. गेल्यावर्षी दोन प्रकल्प मिळून १७ टक्के होता यंदा तो ४ टक्क्यांवर आला आहे. सात मध्यम प्रकल्प असून त्यातील २ कोरडेठाक तर एकाची पाणी पातळी जोत्याखाली गेली आहे.
५७ लघू प्रकल्पांपैकी २६ कोरडे तर १८ प्रकल्पांची पाणी पातळी जोत्याखाली आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये कल्याण गिरजा ३.५५ टक्के तर कल्याण मध्यम प्रकल्पांत ०.१९, अप्पर दुधना प्रकल्प बदनापूर कोरडा, भोकरदन तालुक्यातील जुई मध्यम १.२७, जाफराबाद तालुक्यातील धामणा मध्यम जोत्याच्या खाली तर अंबड तालुक्यातील गल्हाटी मध्यम प्रकल्प कोराडा पडला आहे. तर लघू प्रकल्पांपैकी वाकी, जामवाडी, नेर, कुंभेफळ, सोमठाणा, राजेवाडी, बरंजळा, चिंचखेडा, डावरगाव, मार्डी, रोहिलागड, कानडगाव, धनगरपिंपरी, खडकेश्वर, टाका, लासुरा, पानेगाव, मुसाभद्रायणी, मंडाळा, जांबसमर्थ, मानेपुरी, बोररांजणी, वाई, बामणी, हस्तूरतांडा येथील प्रकल्प कोरडेठाक आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Shortage of short and medium plant water storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.