शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याचे 'शॉर्टसर्किट'; शेकडो हेक्टरवरील रब्बी पिकांना ४४०चा 'शॉक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST

जालना : महावितरणचे वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी सूचनांचा ‘फ्यूज’ टाकत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यातच ‘शॉर्टसर्किट’ होत आहे. याचीच प्रचिती अंतरवाली दायी ...

जालना : महावितरणचे वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी सूचनांचा ‘फ्यूज’ टाकत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यातच ‘शॉर्टसर्किट’ होत आहे. याचीच प्रचिती अंतरवाली दायी (ता. घनसावंगी) शिवारातील शेतकऱ्यांना येत आहे. गत पंधरा दिवसांपासून या भागाला वीज पुरवठा करणारे रोहित्र जळाले आहे. परिणामी, पाण्याअभावी रब्बीतील पिकांना ‘शॉक’ बसत असून, ही पिके करपून जात आहेत.

गतवर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातून खरीपातील पिके गेली आहेत. शासनाकडून वितरीत करण्यात आलेल्या अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित आहेत. शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आशा आता रब्बीतील पिकांवर आहेत. त्यातही रोगराईमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आता महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटकाही अंतरवाली दायी (ता. घनसावंगी) भागातील शेतकऱ्यांना बसत आहे. अंतरवाली दायी परिसरातील संपूर्ण पिके विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. भुतेगाव येथील उपकेंद्रांतर्गत अंतरवाली भुतेगाव या भागातील संपूर्ण क्षेत्र आहे. परंतु, या भागाला वीजपुरवठा करणारे राेहित्र मागील पंधरा दिवसांपूर्वी जळालेले आहे. रोहित्र दुरूस्त करून द्यावे, यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांपासून तालुक्याच्या अधिकाऱ्यांपर्यंत पाठपुरावा केला. परंतु, कर्तव्याचेच 'शॉर्टसर्किट' झालेल्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या मागणीला अद्यापही गांभीर्याने घेतलेले नाही. गत पंधरा दिवासंपासून पाणीच न मिळाल्याने या भागातील असंख्य शेतकऱ्यांचा गहू करपून जात आहे. विशेष म्हणजे जळणारी पिके पाहून या भागातील शेतकऱ्यांनी रोहित्रासाठी लोकवर्गणी करण्याची तयारीही दर्शविली आहे. परंतु, ना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना घाम फुटतो ना अधिकाऱ्यांना ! याबाबत महावितरणचे उपअभियंता विपीन मेश्राम यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. आता या प्रश्नाकडे पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी लक्ष देऊन महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचनांचा ‘फ्यूज’ टाकावा, अशी मागणी या भागातील शेतकरी करीत आहेत.

पाठपुरावा करून थकलो

आमच्या शेतीला वीजपुरवठा करणारे रोहित्र जळून पंधरा दिवसांहून अधिकचा कालावधी लोटला आहे. परंतु, संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तो दुरूस्त करून दिलेला नाही. शेतकऱ्यांनी रोहित्रासाठी लोकवाटा संकलित करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, त्यालाही महावितरणचे अधिकारी दाद देत नाहीत.

विनोद बरसाले

शेतकरी

पिकांचे मोठे नुकसान

यापूर्वी पावसामुळे खरीपातील पिके वाया गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी उसनवारी करून रब्बीची पेरणी केली. पिके चांगली आल्याने काहीतरी हाती पडेल, अशी आशा होती. परंतु, पिकांना पाणी देण्यासाठी लाईट नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

मदन गोटे

शेतकरी,

फोटो कॅप्शन : विजेअभावी पाणी देता येत नसल्याने अंतरवाली दायी भागातील गहू असा वाळून जात आहे.