धक्कादायक ! जालन्यात सहायक फौजदाराची गोळी झाडून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 11:11 IST2020-09-08T11:11:01+5:302020-09-08T11:11:28+5:30

शस्त्रागार विभागाच्या पाठीमागे जाऊन स्वत:वर गोळी झाडून घेतली.

Shocking! Assistant Faujdar suicide by shot himself in Jalna | धक्कादायक ! जालन्यात सहायक फौजदाराची गोळी झाडून आत्महत्या

धक्कादायक ! जालन्यात सहायक फौजदाराची गोळी झाडून आत्महत्या

ठळक मुद्देआत्महत्येचे कारण अस्पष्ट

जालना : पोलीस मुख्यालयात सहायक फौजदार म्हणून कार्यरत असलेले सुभाष गायकवाड (५४) हे मंगळवारी सकाळी स्वत:कडील पिस्तूल जमा करण्यासाठी पोलीस मुख्यालयाच्या शस्त्रागार विभागाकडे गेले होते. मात्र, त्याचवेळी त्यांनी शस्त्रागार विभागाच्या पाठीमागे जाऊन स्वत:वर गोळी झाडून घेतली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस उपाधीक्षक अभय देशपांडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, संजय लोहकरे, यशवंत जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सहायक फौजदार गायकवाड यांनी कोणत्या कारणाने आत्महत्या केली? हे स्पष्ट होऊ शकले नाही.

Web Title: Shocking! Assistant Faujdar suicide by shot himself in Jalna