मराठवाड्यात शिवरायांच्या विचारांचा अश्वमेध! ५१ वाहनांच्या ताफ्यासह शिवस्मारक यात्रेला प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 13:50 IST2026-02-14T13:49:16+5:302026-02-14T13:50:14+5:30

मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांत घुमणार शिवगर्जना; 'या' मार्गाने मार्गक्रमण करणार यात्रा.

Shiv Smarak Yatra Begins from Mahakala: Grand Procession with 51 Vehicles to Cover 8 Districts of Marathwada | मराठवाड्यात शिवरायांच्या विचारांचा अश्वमेध! ५१ वाहनांच्या ताफ्यासह शिवस्मारक यात्रेला प्रारंभ

मराठवाड्यात शिवरायांच्या विचारांचा अश्वमेध! ५१ वाहनांच्या ताफ्यासह शिवस्मारक यात्रेला प्रारंभ

वडीगोद्री (जालना): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान'च्या वतीने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये भव्य 'शिवस्मारक यात्रे'चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारपासून (१४ फेब्रुवारी) महाकाळा येथून या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. समाजातील प्रत्येक व्यक्तीने शिवरायांचा आदर्श आपल्या आचरणात आणावा, या उदात्त हेतूने ही यात्रा काढण्यात आली आहे.

महापुरुषांच्या मूर्तींनी वेधले लक्ष
या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे एकाच रथात बसवलेले सर्व महापुरुषांचे अर्धाकृती पुतळे आणि त्यासोबतच प्रभू श्रीराम, विठ्ठल-रुक्माई व महादेवाची मूर्ती. ५१ सजवलेल्या वाहनांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळे असून, या अभूतपूर्व दृश्याने शिवभक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडले आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात शिवविचारांचा प्रसार करणार आहे.

असे असेल मार्गक्रमण
ही यात्रा १४ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकातून मंठा, जिंतूरमार्गे बोरी येथे मुक्कामासाठी पोहोचेल. त्यानंतर १५ फेब्रुवारीला परभणी, हिंगोली, नांदेड; १६ फेब्रुवारीला लातूर, धाराशिव आणि १७ फेब्रुवारीला कळंब, अंबाजोगाई, परळीमार्गे माजलगाव येथे या भव्य यात्रेचा समारोप होईल.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी गोंदी पोलिसांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसह १०० जणांचा तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. ठिकठिकाणी शिवभक्तांकडून या रथाचे जंगी स्वागत केले जात असून, संपूर्ण मराठवाडा सध्या भगव्या रंगात न्हाऊन निघाला आहे.

Web Title : मराठवाड़ा में शिवाजी के विचारों का अश्वमेध: शिव स्मारक यात्रा शुरू!

Web Summary : मराठवाड़ा में शिवाजी महाराज के आदर्शों का जश्न मनाते हुए एक भव्य शिव स्मारक यात्रा 51 वाहनों के काफिले के साथ शुरू हुई। धर्मवीर छत्रपति संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान द्वारा आयोजित, यात्रा का उद्देश्य आठ जिलों में शिवाजी के सिद्धांतों का प्रसार करना है, जो कड़ी पुलिस सुरक्षा के साथ प्रमुख शहरों से गुजरने के बाद माजलगांव में समाप्त होगी।

Web Title : Shivaji's Ideals Ride Through Marathwada: Shiv Smarak Yatra Begins!

Web Summary : A grand Shiv Smarak Yatra, celebrating Shivaji Maharaj's ideals, commenced in Marathwada with a 51-vehicle convoy. Organized by Dharmveer Chhatrapati Sambhajiraje Shaurya Pratishthan, the yatra aims to spread Shivaji's principles across eight districts, concluding in Majalgaon after traversing key cities with tight police security.