शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

भरीव नुकसान भरपाईसाठी शिवसेनेने केली निदर्शने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 00:44 IST

विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपये, फळबागांसाठी ५० हजार रूपये अनुदान द्यावेत आदी विविध मागण्यांसाठी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.जालना जिल्ह्यात परतीच्या पावसाने मोठा धुमाकूळ घातला. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या कापूस, मका, ज्वारी, सोयाबीन, मूग, बाजरी, उडीद आदी खरीप पिकांसह फळबागा उध्दवस्त झाल्या. अनेक शेतक-यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या. जिल्ह्यातील ६ लाख १५ हजार १६५ हेक्टर पेरणीखालील क्षेत्र आहे. पैकी सोयाबीनचे १ लाख २५ हजार ९६७ हेक्टर, कापूस २५ हजार हेक्टर, मका ४८ हजार ८१५ हेक्टर, बाजरी ७ हजार ६५६ हेक्टर क्षेत्रावर आहे. पैकी जवळपास ४ लाख ६५ हजार पेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. जालना तालुक्यातील ८१ हजार २१६ हेक्टर पैकी ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे.शासनाने नुकसानीपोटी जाहीर केलेली मदत तोकडी आहे. त्यामुळे शेतक-यांना सरसकट प्रती हेक्टरी २५ हजार रूपये तर फळबागांना हेक्टरी ५० हजार रूपयांची नुकसान भरपाई द्यावी यासह इतर मागण्या करण्यात आल्या. यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर, गोदावरी खोरे विकास ममहामंडळाचे अध्यक्ष जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, पंडित भुतेकर, रावसाहेब राऊत, अ‍ॅड. भास्कर मगरे, पांडुरंग डोंगरे, महिला प्रमुख सविता किवंडे, संतोष मोहिते, दिपक रणनवरे, विष्णू पाचफुले, बबनराव खरात, हरिहर शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जोरदार घोषणाही देण्यात आल्या.कर्जवसुली तात्काळ थांबवासततचा दुष्काळ आणि यंदा झालेली अतिवृष्टी यामुळे शेतकरी अनेक संकटात आहेत. शेतक-यांचा आर्थिक कणा मोडला आहे. त्यामुळे बँकांकडून होणारी सक्तीची कर्जवसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणीही शिवसैनिकांनी केली आहे.

टॅग्स :agitationआंदोलनShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र