मारहाणीत गंभीर जखमी व्यक्तीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:54 IST2019-06-18T23:53:48+5:302019-06-18T23:54:04+5:30

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला.

Seriously injured person dead | मारहाणीत गंभीर जखमी व्यक्तीचा मृत्यू

मारहाणीत गंभीर जखमी व्यक्तीचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. या प्रकरणी पाच जणांविरूध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी शहरातील खांडसरी भागात घडली होती.
मयताचा भाऊ सय्यद अतिक सय्यद इसाक यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सय्यद शफीक सय्यद इसाक (३५) यांनी शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन आरोपी श्रावण उर्फ पिंट्या सीताराम काळे, बबन काळे, संदीप शंकर जाधव यांनी सोमवारी साथीदार जमवून सय्यद शफिक सय्यद इसाक यास लोखंडी गजाने मारहाण केली. जखमीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
तीन आरोपी अटकेत
याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. यात आरोपी श्रावण काळे यास जालना रेल्वेस्थानक येथून पकडले. दुसरा आरोपी संदीप जाधव यास कोडी (कारला) रेल्वेस्टेशन येथून ताब्यात घेतले. तसेच तिसरा आरोपी बबन काळे यास रेल्वेपुलाजवळ पकडले.
ही कारवाई एडीएसचे पोनि. यशवंत जाधव, पो.नि. संजय देशमुख, पोउपनि. विजय जाधव, निशा बनसोड, कर्मचारी कैलास खार्डे, मनोज काळे, वसंत धस, किरण चेके, फुलचंद गव्हाणे, मनोहर भुतेकर यांनी केली.

Web Title: Seriously injured person dead