समृध्दी महामार्गावर कार कंटेनरवर धडकली; मायलेकीसह एकाचा जागीच मृत्यू

By दिपक ढोले  | Updated: June 9, 2023 17:13 IST2023-06-09T17:12:46+5:302023-06-09T17:13:43+5:30

निधोना येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार कंटेनरला धडकली.

Series of accidents continue on Samruddhi Highway; Three killed after car collides with container | समृध्दी महामार्गावर कार कंटेनरवर धडकली; मायलेकीसह एकाचा जागीच मृत्यू

समृध्दी महामार्गावर कार कंटेनरवर धडकली; मायलेकीसह एकाचा जागीच मृत्यू

चंदनझिरा : चालकाने नियंत्रण सुटून कार कंटेनरला धडक दिल्याची घटना नागपूर-जालना समृध्दी महामार्गावर शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात जीपमधील मायलेकीसह अन्य एक जण जागीच ठार झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी असून, त्याच्यावर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

नागपूर येथील रहिवासी मालुबाई पुरी आणि त्यांची मुलगी शांताबाई पुरी या दोघी गुरुवारी सायंकाळी अहमदनगर येथे गेल्या होत्या. शुक्रवारी सकाळी त्या रामोजी शिवराज तिजारे यांच्या वाहन क्रमांक (एम.एच. ४९. बीडब्ल्यू.०६१५)ने पुन्हा नागपूरकडे जात होत्या. दुपारी बारा वाजेच्या सुमारास निधोना येथे आल्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार कंटेनरला धडकली. नंतर जीप दुभाजकावर जाऊन धडकली. यामध्ये रामोजी शिवराज तिजारे (५०), मालुबाई पुरी (७०) आणि शांताबाई पुरी (४५) हे तिघेजण जागीच ठार झाले आहेत. रामोजी तिजारे यांचा मुलगा सूरज तिजारे (३०) हा जखमी झाला असून, त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच, महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. कंटेनर चालक पळून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

Web Title: Series of accidents continue on Samruddhi Highway; Three killed after car collides with container