दीपक भिंगारदेव यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:20 IST2021-07-08T04:20:37+5:302021-07-08T04:20:37+5:30
गायरान परिषदेच्या प्रमुखपदी घेवंदे जालना : गायरान हक्क परिषदेच्या मराठवाडा विभाग प्रमुखपदी दिनकर घेवंदे यांची निवड करण्यात आली आहे. ...

दीपक भिंगारदेव यांची निवड
गायरान परिषदेच्या प्रमुखपदी घेवंदे
जालना : गायरान हक्क परिषदेच्या मराठवाडा विभाग प्रमुखपदी दिनकर घेवंदे यांची निवड करण्यात आली आहे. रमेश साळवे, प्रदीप अंभोरे यांनी ही परिषद स्थापन केली आहे. या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुंबई आ. भाई जगताप यांची भेट घेतली. यावेळी गायरान जमीन संदर्भात चर्चा करण्यात आली.
पळशखेडा येथील रोहित्र जळाले
भोकरदन : तालुक्यातील पळसखेडा दाभाडी येथील रोहित्र गेल्या दोन महिन्यांपासून जळाले असून, गावकऱ्यांना अंधारात रात्र काढावी लागत आहे. वारंवार निवेदन देऊन देखील कोमात असलेल्या महावितरणाला जाग येत नसल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कृषी सहायक रेंगे यांचा सेवा गौरव
घनसावंगी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०२०-२१ मध्ये तालुका कृषी अधिकारी घनसावंगी कार्यालयाने तालुका राम रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली १०६२ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करून महाराष्ट्र राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते औरंगाबाद विभागामध्ये घनसावंगी तालुक्यातील सर्वांत जास्त फळबाग लागवड करणारे कृषी सहायक व्ही. पी. रेंगे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
पारनेर येथे किशोर स्वास्थ कार्यक्रम
अंबड : अंबड तालुक्यातील धनगर प्रिंपी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्र पारनेर येथे मंगळवारी राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रमांतर्गत किशोरवयीन आरोग्य दिवस वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी डॉ. मंगला जोशी, जया कस्तूरे, मीरा राजपूत, मीरा मगरे आदींची उपस्थिती होती.
परतूर येथे मंदिर परिसरात वृक्षारोपण
जालना : येथील श्री गणेश कुंज साईनाथ मंदिर परिसरात प्रहार अपंग क्रांती संघटना व जनशक्ती पक्षाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अध्यक्ष सुनील शिंदे, ज्ञानेश्वर आढे, माऊली कदम, दादाराव बकाल, विकास काळे, श्याम राठोड, अमोल ससाने, महेश काळे, लक्ष्मण हिवाळे, रामकृष्ण वंगुर, आनंद वंगुर, रवींद्र अंभोरे आदींची उपस्थिती होती.
रवना येथे वन्य-प्राण्यांचा धुमाकूळ
राणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील रवनासह परिसरात वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातला असून, या प्राण्यांकडून उगवण झालेल्या कोवळ्या पिकांची मोठी नासाडी होत आहे. वनविभागाने या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
विस्कळीत वीजपुरवठा, ग्राहकांची गैरसोय
आंबा : परतूर तालुक्यातील आंबा व परिसरातील वीजपुरवठा अचानक गूल होण्याचे प्रमाण वाढले आहे. वीज अचानक गायब होत असल्याने ग्राहकांना एक ना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. त्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी उपलब्ध पाणी पिकांना देण्याचा प्रयत्न करीत आहेत ; परंतु विजेअभावी शेतकऱ्यांचीही गैरसोय होत आहे.
अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईची मागणी
बदनापूर : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे. तळीरामांमुळे भांडण- तंट्यात वाढ होत असून, कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय महिला, मुलींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाने लक्ष देऊन कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
कारवाईची मागणी
घनसावंगी : शहरासह ग्रामीण भागात अवैध गुटखा विक्रीचे प्रमाण वाढले आहे. शासनाने बंदी घातलेली असतानाही हे बंदी आदेश झुगारून अवैधरीत्या व्यवसाय केला जात आहे. तरी संबंधितांनी लक्ष देऊन अवैध गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
आज सर्वपक्षीय बैठक
जालना : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सर्वपक्षीय नागरी जयंती उत्सव समितीची बैठक गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अंबड चौफुली जवळील शासकीय विश्रामगृहात बोलविण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन अनिल सावळे, किशोर कांबळे यांनी केले.
चालकांची गैरसोय
अंबड : शहराला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तरी संबंधितांनी लक्ष देऊन रस्त्यांची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.