ब्रेथअॅनलायझरद्वारे तळीरामांचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 00:03 IST2020-03-09T00:02:44+5:302020-03-09T00:03:01+5:30
तळीरामांची ब्रेथ अॅनलायझरद्वारे तपासणी करून कारवाई केली जाणार असल्याचा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी दिला.

ब्रेथअॅनलायझरद्वारे तळीरामांचा शोध
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : होळी, रंगपंचमीसह इतर सण, उत्सव सर्वांनी शांततेत साजरे करावेत. होळी, रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तळीरामांची ब्रेथ अॅनलायझरद्वारे तपासणी करून कारवाई केली जाणार असल्याचा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी दिला.
शहरातील सदरबाजार पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री खिरडकर यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी पोनि संजय देशमुख, पोनि लोहकरे, पोनि महाजन, मित्तल, स्वातंत्र्य सैनिक दायमा यांची प्रमुख उपस्थिती होती.
होळी, रंगपंचमीसह इतर सणाची लगबग सुरू आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी दुष्काळ अनुभवला आहे. त्यामुळे रंगांची उधळण करताना पाण्याचा जपून वापर करावा. शक्य झाल्यास फुलांची उधळण करावी. सण- उत्सवाला गालबोट लागू नये, याची दक्षता सर्वांनी घ्यावी, कायदा हातात घेणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही खिरडकर यांनी यावेळी दिला. यावेळी नरेंद्र मित्तल, सुभाष देविदान, ओमप्रकाश शिंदे, संतोष क-हाळे, इलियास लखारा, पारस यादव, सय्यद मुश्ताक, अंकुश राऊत, ज्ञानेश्वर कवळे, अफसर चौधरी, सुशील गौड यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.