स्काॅर्पिओ - दुचाकी अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:29 AM2021-03-06T04:29:44+5:302021-03-06T04:29:44+5:30

राजूर (जि. जालना) : स्काॅर्पिओ व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास राजूरजवळील राजुरेश्वर कॉटेक्स ...

Scorpio - One killed in a two-wheeler accident | स्काॅर्पिओ - दुचाकी अपघातात एक ठार

स्काॅर्पिओ - दुचाकी अपघातात एक ठार

googlenewsNext

राजूर (जि. जालना) : स्काॅर्पिओ व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास राजूरजवळील राजुरेश्वर कॉटेक्स जिनिंगसमोर घडली. या अपघातात दुचाकीस्वार संपत सुखदेव मदन (४५ रा.केळीगव्हाण, ता. बदनापूर) हे जागीच ठार झाले, तर त्यांची पत्नी ताराबाई ऊर्फ जनाबाई संपत मदन (४०) या गंभीर जखमी झाल्या.

पळसखेडा, ठोंबरी येथून रतन ठोंबरे हे शुक्रवारी सायंकाळी स्काॅर्पिओने (क्र. एमएच १६ एटी १००५) राजूरकडे येत होते, तर संपत सुखदेव मदन हे दुचाकीने (क्र. एमएच २१आय ८९४०) पत्नीसह भोकरदनकडे एका नोतवाइकाच्या विवाह सोहळ्याला जात होते. राजुरेश्वर कॉटेक्स जिनिंगजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील संपत मदन हे जागीच ठार झाले, तर त्यांची पत्नी ताराबाई ऊर्फ जनाबाई मदन या गंभीर जखमी झाल्या. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचे समोरचे चाक निखळून पडले, तर स्काॅर्पिओचे मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांनी जखमींना तातडीने राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉ. कावले यांनी संपत मदन यांना मयत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच राजूर पोलीस चौकीचे सहायक निरीक्षक शिवाजी देशमुख, पोलीस नाईक गणेश मान्टे, दुर्गेश राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली.

===Photopath===

050321\05jan_10_05032021_15.jpg~050321\05jan_11_05032021_15.jpg

===Caption===

अपघातात नंतर स्कार्पिओचे झालेले नुकसान~अपघातानंतर दुचाकीची अशी अवस्था झाली.

Web Title: Scorpio - One killed in a two-wheeler accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.