बोंडअळीबाबत सरपंच परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:30 IST2018-08-12T00:29:53+5:302018-08-12T00:30:40+5:30
बदनापूर येथील पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी बोंडअळीसह विविध विषयांवर सरपंच परीषदेचे आयोजन करण्यात आले होते.

बोंडअळीबाबत सरपंच परिषद
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : येथील पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी बोंडअळीसह विविध विषयांवर सरपंच परीषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या परीषदेचे उद्घाटन आ. नारायण कुचे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श ग्राप पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे, सभापती अश्विनी मदन, उपसभापती श्रीराम कान्हेरे, किसान सेनेचे जिल्हाप्रमुख भानुदास घुगे,तालुका प्रमुख जयप्रकाश चव्हाण, सरपंच राम पाटील यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषि अधिकारी रामदास पाटील यांनी करून बोंडअळी व अन्य विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी आ नारायण कुचे, तहसीलदार प्रविण पांडे, प्रभारी गटविकास अधिकारी के. डी. भुतेकर ,सरपंच भास्करराव पेरे, शास्त्रज्ञ नितीन पतंगे, गोसावी, सुरडकर यांनी बोंडअळीवरील उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
तसेच या परीषदेमधे १३ कोटी वृक्षलागवड व संवर्धन, भारत संचार नेट कनेक्टीव्हिटी, नवीन रेती निर्गती धोरण व ग्रामपंचायत, गाळमुक्त कामाच्या अंतिम देयकाचे ठराव,पाणी टंचाई उपाययोजना आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश तुपे यांनी केले या परीषदेस तालुक्यातील अनेक सरपंच, उपसरपंच, ग्राप सदस्य, कृषि अधिकारी, पंस कर्मचारी, ग्रामसेवक अनेकांची उपस्थिती होती.