शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांनी घातला थेट अधिकाऱ्यांच्या अंगावर जेसीबी; भोकरदनमध्ये थरार, ९ जणांवर गुन्हे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 19:02 IST

अधिकाऱ्यांनी माघार न घेता तब्बल १२ किलोमीटर फिल्मी स्टाईल पाठलाग करून अवैध जेसीबी जप्त केला आहे.

भोकरदन (जालना) : तालुक्यातील जवखेडा ठोंबरे येथे अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाच्या अंगावर वाहन घालून त्यांना जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उपविभागीय अधिकारी बी. सरवनन आणि तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांच्या पथकाला वाळू माफियांनी केवळ धमकावलेच नाही, तर वाहने आडवी लावून सरकारी कामात अडथळा आणला. मात्र, या अधिकाऱ्यांनी माघार न घेता तब्बल १२ किलोमीटर फिल्मी स्टाईल पाठलाग करून अवैध जेसीबी जप्त केला आहे.

नेमका प्रकार काय?जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशानुसार, भोकरदन परिसरात वाळू उपशाविरोधात मोहीम सुरू आहे. १४ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास जवखेडा ठोंबरे येथील पूर्णा नदी पात्रात महसूल पथकाने छापा टाकला. यावेळी एक विना नंबरचे ट्रॅक्टर आणि जेसीबी (MH 21 CG 2732) वाळू उपसा करताना आढळले. पथकाने कारवाई सुरू करताच एका पांढऱ्या कारसह पाच दुचाकींनी अधिकाऱ्यांचा रस्ता रोखला. "कारवाई केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील," अशी धमकी देत माफियांनी जेसीबी पळवून नेला.

१२ किलोमीटरचा थरारमाफियांनी अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला, मात्र सहाय्यक जिल्हाधिकारी बी. सरवनन आणि तहसीलदार काकडे यांनी स्वतःच्या वाहनाने त्यांचा पाठलाग सुरू ठेवला. हा थरार तब्बल १२ किलोमीटर चालला. शेवटी निमखेडा शिवारातील एका मकाच्या शेतात लपवलेला जेसीबी अधिकाऱ्यांनी शोधून काढला आणि जप्त केला.

९ जणांवर गुन्हा, 'लोकेशन' देणाऱ्यांची आता खैर नाहीयाप्रकरणी तलाठी अविनाश चव्हाण यांच्या तक्रारीवरून गजानन ठोंबरे, परमेश्वर ठोंबरे यांच्यासह ९ जणांविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईवर बोलताना बी. सरवनन म्हणाले की, "अधिकाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून वाळू माफियांना 'लोकेशन' देणाऱ्या पाळत ठेवणाऱ्यांवरही आता 'एमपीडीए' (MPDA) आणि हद्दपारीची कडक कारवाई केली जाईल."

English
हिंदी सारांश
Web Title : Sand mafia attacks officials with JCB; 9 booked in Bhokardan.

Web Summary : In Bhokardan, sand mafia attacked revenue officials with a JCB during an anti-illegal mining operation. Officials pursued them for 12 km, seized the JCB, and filed charges against nine individuals, including those providing location information.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाsandवाळू